Skip to main content

पातंजल योगदर्शन

लेखक शरद यांनी शनिवार, 11/12/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
पातंजल योगदर्शन योग ह्या विषयावर आलेल्या लेखाला चांगला वाचकवर्ग व प्रतिसाद मिळाला. खरे म्हणजे मागेच योगदर्शन या दर्शनाबद्दल लिहावयाचा विचार होता. पण त्यावेळी या विषय इतका आवडीचा असेल असे वाटले नव्हते म्हणून राहिले. असो. प्रथम त्या लेखावरील विषयांची काही माहिती घेऊन आपण योगदर्शनाकडे येऊ. (१) योगासने : पाश्चात्य देशात "योग म्हणजे योगासने व काही प्रमाणात प्राणायाम" अशी समजुत झाली आहे असे वाटते. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतातील योगाचे साध्य वेगळे आहे व त्या मार्गात आसने व प्राणायाम ही साधने मानली गेली आहेत.

पाकिस्तानी व्रुत्तपत्रांची मान खाली

लेखक शेखर काळे यांनी शनिवार, 11/12/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ही पहा आजची बातमी - http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-how-pak-media-used-w… पाकिस्तानी वृत्त संस्था कधी अशी दिलगिरी व्यक्त करत नाहीत. आताच हे असे कसे झाले ?

माणुसकीचा झरा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 11/12/2010 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीचा झरा तो शोधात असतो माणसातल्या माणुसकीचा झरा त्याला भेटतात छान अशी माणसे प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे कारण तो एकटा आहे ह्या जगात एखादा भेटतो कपटी नाही असे नाही स्वार्थी .! मतलबी ..!! पण तो माफ करतो नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा अशे त्याला खूप झरे सापडले डाक्टरच्या रूपाने मैत्रीच्या रूपाने ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले लाखो अंधासाठी आपले कसब लावले नि दिले दृष्टी हिरवी हिरवी
काव्यरस

बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

लेखक भानस यांनी शुक्रवार, 10/12/2010 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस * पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या * ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी * सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर * दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर. * दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे ) * सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल. मार्गदर्शन दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत.

इकडची गोची

लेखक रन्गराव यांनी शुक्रवार, 10/12/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे. http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beat… स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही. भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 10/12/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-"परिचय"-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १ मूळ लेखकः श्री पवनकुमार वर्मा अनुवादकः सुधीर काळे © मूळ लेखकाच्या वतीने: सुधीर काळे (या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत) "भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगाच्या बाबतीतही समर्पक आणि प्रसंगोचित आहे.

आई .. मिटलेला श्वास.. १२

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 10/12/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास..११ नदीचा सुन्न किनारा पाणी वाहतेय जपून ओल्या हिरव्या तनांवर निळसर घाव थबकून चांदणे हरवलेली सुनी खिन्न गर्भरात प्रतिबिंबित गहिरा रंग मनावर काळसर रंगहीन स्वप्नांचा धुसर स्तब्ध प्रवाह दिशाहीन नेत्रनजर अन निशब्द आठवांचे काहूर - शब्दमेघ

१ विनोद

लेखक अश्फाक यांनी शुक्रवार, 10/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ? पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे . पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे . पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते "सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"