विधाता
माझा असा पचका बर्याच वेळेस होतो. एखादा चित्रपट अचाट आणि अतर्क्य असेल म्हणून रेवडी उडवायला वैचारिक उच्चासनावर बसावे आणि चित्रपट नेमका चांगला निघतो. ह्याबद्दल जवळजवळ तसेच झाले. पण जे काही थोडेफार दिसले ते गोड (किंवा खमंग) मानून घ्यावे.
'विधाता' ला असलाच एक मिळाला म्हणून आधी खवचट हसू घेऊन बघायला बसलो, आणि यातील दिग्गजांच्या अभिनयाने थक्क झालो. संजीवकुमारच्या अनेक नकला नंतर बघितल्यामुळे मूळ अदाकारीच आता जरा 'अती' वाटते पण ती त्याची चूक नाही. शम्मी ही मस्त. पण खरी मजा आणतो दिलीप कुमार. अमिताभच्या अनेक पिक्चर्स प्रमाणे काही काही ठिकाणी अचाट प्रसंगही दिलीप कुमार जबरी उचलतो.
मिसळपाव
