Skip to main content

तुरीची आमटी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 01/01/2026 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/01/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/01/2026 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? ====================== - राजीव उपाध्ये मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते). अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे.

ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 31/12/2025 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
Niksen ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing ! अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत.

सैरभैर डायरी - १

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 31/12/2025 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.

इतिहासाची दुरुस्ती

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 30/12/2025 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/12/2025 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 29/12/2025 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

चित्रपट परीक्षण -लूसी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 29/12/2025 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.(स्पॉयलर-ज्यांना साय फाय किवा तत्सम चित्रपट बघायला आवडतात त्यांनी थेट बघा, नाहीतर म्हणाल स्टोरी फोडली) तर चित्रपटाची नायिका लूसी ही एक सामान्य मुलगी आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला बॉयफ्रेंड तिला एक काम सांगतो. तो म्हणतो की त्यांच्याकडची सुटकेस समोरच्या हॉटेलातील काउंटरवर नेऊन दिलीस तर तुला एक हजार डॉलर मिळतील. अर्थात हा काहीतरी झोल असणार असे वाटून ती नकार देते.

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2025 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.