Skip to main content

इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 19/01/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते! या नगराच्या बाहेरच्या वनात प.पू. तानियामावशी एक गुरुकुल चालवत असत. गुरुकुल शंभर-सव्वशे वर्षांपूर्वी स्थापले गेले होते व ते प.पू. तानियामावशींच्या आधी त्यांचे दिवंगत पति व त्या आधी त्यांच्या सासूबाई तसेच आजे-सासरे व त्याही आधी त्यांचे वडील चालवत असत. मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्‍या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.

मासे २०) निवटे

लेखक जागु यांनी बुधवार, 19/01/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : निवटे हिंग हळद मसाला मिठ तेल निवट्या ह्या खाडीच्या किंवा समुद्राच्या चिखलात मिळतात. निवट्या खाडीच्या चिखलातही उडताना दिसतात. निवट्यांच्या वाट्याला कोर म्हणतात. २४ निवट्यांची एक कोर. निवट्यांमध्ये भरपुर कॅल्शियम असते असे म्हणतात. त्यांच्या डिझाईनमुळे काहिजणांना त्या आवडत नाहीत पण ते चुकी करतात कारण एकतर कॅल्शियम गमावतात आणि दुसरे म्हणजे ह्या खुप चविष्ट असतात. पहा कसे फिशटँकमध्ये सोडण्यासारखे मासे आहेत. अगदी रंगिबिरंगी. निवट्या बाजारात जिवंतच मिळतात.

"तीन दीवे" एक कोडं !!

लेखक महेश काळे यांनी बुधवार, 19/01/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका घरात तीन खोल्या अहेत. पहिल्या खोलित ३ स्विच (बटणं) अहेत. अणी तिसर्र्या खोलित ३ दिवे (बल्ब) अहेत (४० वेट) (सर्व वायरिंग अंतर्गत आहे) तुम्ही पहिल्या खोलितुन तिसर्या खोलीत जाउ शकता.. परन्तु पुन्हा पहिल्या खोलीत येउ शकत नहि. तर कोणत्या दिव्याचा कोणता स्वीच अहे हे कसे ओळखाल ??

रजनीकांत

लेखक महेश काळे यांनी बुधवार, 19/01/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
१. संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल. २. एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. ३. अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’ ४. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल? ५. रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला. ६. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं..
काव्यरस

थालि

लेखक पियुशा यांनी बुधवार, 19/01/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
tali काही दिवसापूर्वी मस्त हुरडा पार्टी हादडण्याचा योग आला होता हुरड्याबरोबर घेतलेली अस्सल गावरान थाळी अहा अ हा हा हा अजून चव रेंगाळतेय जिभेवर ! म्हणून हा खटाटोप करावासा वाटला खास तुमच्या साठी झणझणीत भरलं वांग : wang साहित्य ;- वा

कुमार गोडबोल्यांची प्रेमकहानी ...

लेखक टारझन यांनी बुधवार, 19/01/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
कु गोडबोल्यांची प्रेम कहानी रामदास सर काय मिष्टर गोडबोल्यांच्या प्रेमकहानीची उत्तरपुजा घालेनात म्हणुन आमच्या आसपासच्या गोडबोल्यांची प्रेम कहानी लिहु म्हंटलं :) हं तर झालं असं हे कु. गोडबोले नुकतेच एका मल्टिनॅशनल सॉफ्टवेयर कंपनी मधे रुजु झाले होते. मी नुकताच रुजु झालो होतो आणि नविन जागेवर बसायला आल्याच्या दुसर्‍या दिवशी कु. गोडबोले क्युबिकलात बाजुच्या डेस्कावर आले होते. कु. गोडबोले तसे लाजरे बुजरे दिसत होते. घरचं वातावरण कडक असावं. कारण ते दिवसातुन जेवढे दोन चार शब्द बोलत त्याला देखील साखरेचा मुलामा लावुन गोड आवाजात बोलत.

आपण पांढरा हत्ती पाळताय का ? ( उत्तरार्ध)

लेखक असहकार यांनी बुधवार, 19/01/2011 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा हत्ती म्हणजे काय रे भाऊ ? न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च ? का न झेपणार्‍या , न पटणार्‍या पण प्रवाहासोबत राहण्याकरता अंगीकारलेल्या सवयी ? का न झेपणारी, पण पटणारी पण प्रवाहाविरुध्द पोहण्याची धड्पड ? का मुल्यांशी केलेली तडजोड जी जीवाला बोचणी लावते ? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- (आधीच्या धाग्याला दिलेल्या प्रतिसादाकरता धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पांढरा हत्ती म्हणज

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

विमानकोडं..

लेखक गवि यांनी बुधवार, 19/01/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
साधा प्रश्न आहे. दोन विमानतळ आहेत. त्यामधे अंतर ६ तास उड्डाणाएवढं आहे. सर्व विमानांचा वेग एकसारखा आहे वार्‍यामुळे वगैरे होणारा फरक नगण्य आहे. दोन्ही विमानतळांवरून बरोब्बर दर एक तासाने (पूर्ण तासाच्या वेळा, उदा १२, १,२,३,४ इ.इ. वाजता ) एक विमान दुसर्‍या एअरपोर्टसाठी टेक ऑफ करतं. ("ए" कडून "बी" कडे आणि "बी कडून "ए" कडे.) कोणत्याही एका वेळेस (समजा सकाळी ६ वाजता) "ए" या विमानतळावरून तुम्ही उड्डाण केलंत, "बी" कडे जाण्यासाठी. तर "बी" ला लँड करेपर्यंत तुम्हाला वाटेत एकूण किती विमानं दिसतील. .?

वर्गलढा एक कविकल्पना

लेखक स्वामीयोगेश यांनी बुधवार, 19/01/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
१) साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणी वर्ग लढ्यावर आधारित आहे. त्या अनुसार समाजात २ वर्ग आहेत, १ आहे रे आणि दुसरे नाही रे. आहे रे नाही रेंचे शोषण करून श्रीमंत होत असतो आणि या दोन वर्गांचा लढा सामाजिक आणि राजकीय क्रांती च्या रूपाने उभा करून समाजात समानता आणणे हे यांचे उद्देश्य आहे / होते. २) पण प्रत्यक्षात पूर्वेत आणि पश्चिमेत दोन्ही कडील देशात जर अभिजात साहित्य वाचले तर असे दिसून येते की २ राजांमधेय्च लढाया झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील काव्य नाट्य, साहित्य कृतींमध्येच फक्त वर्ग लढा इ वाचावयास मिळते आहे. आजही टाटा बिर्लाशी लढतो आहे, अंबानी त्यांनाच समकक्ष अश्या स्पर्धकांशी लढतो आहे.