भारतातील विद्यार्थ्यांची रोजगार-योग्यता?
भारतातील विद्यार्थ्यांची employability (रोजगार-योग्यता ?) - खरं तर आतापर्यंत हा विषय बरेचदा वाचला होता आणि ह्याविषयी छापल्या गेलेल्या टक्केवारीबद्दल व्यक्तीशः साशंकच होतो. पण सध्या आमच्या छोट्या कंपनीसाठी निवड-चाचणी आणि मुलाखती घेताना येत असलेल्या अनुभवावरून हा प्रश्न अधिकच गंभीर आणि मोठा असल्याचं जाणवलं. पण हे चित्र सार्वत्रिक आहे की मी अनुभवलेला अपवाद आहे, ह्याची खात्री करण्यासाठी हा काथ्याकूट. माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती!
काही अंदाजांनुसार, भारतातील अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांची employability २५% पेक्षाही कमी असल्याचे वाचनात आले होते.
असहकार यान्च्या मुलीसाठी कोकणातील केक अर्थात काकडीचे धोन्डस.
साहित्यः-जून काकडी,गुळ,तान्दळाचा रवा(इडली रवा),वेलची पूड्,काजु तुकडा तब्येतीप्रमाणे,नारळाचा चव.
कृती :-काकडी बारीक किसून घ्यावी.त्यातील पाणी काढून बाजुला ठेवावे.तान्दळाचा रवा मन्द विस्तवावर भाजुन घ्यावा.
काकडीच्या किसात रवा मिसळावा.सुके वाटल्यास काकडीचे पाणी घालावें.
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...
दोन कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ...
अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ... (कविता पुन:प्रकाशित)
-----------
१.
मी.. तू अन तुझा पपा
आपल छोटस नटलेल जग..
सासरी तू गेल्या पासुन
बैचेन झाले आहे अगदी, हे घरट ..
तुझी ती रुम, तुझी पुस्तके ,
तुझा कॉम्प, सारं तसच
अगदी शांत ...
आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही
की तुझा किलबिलाट तेथे
अगदी निरस वाटते आहे ग पोरी
आठवतं मला अता ते
तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं
जास्त काम पडयचं मला
पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी
रागारागातच सारं आवरणं
रोज सकाळची तुमची ती मस्ती
आणि ते भांडन ..
आता म्हणा काहीही...
खर सांगायचं तर आम्हाला यात अजिबात पडायचं नव्हत. पण कुणीतरी स्वत: फुलता फुलता आम्हाला 'गेला बाजार ' का असेना पण हाकारल, अन आम्हालाही फुलावास वाटलं.
तशी तेव्हढी एक हाकच आम्हा पुरली असती, पण इथे ढीगभर कारण मिळाली.
जसे की आज राजकुमारांचा वाढदिवस, चू चू ला ओवन नसल्यान कस फुलाव हा पडलेला प्रश्न, इत्यादी, इत्यादी.
हा तर काय बोलत होतो आपण?... कुणीस हाकारल स्वत: फुलता फुलता...
अन मग आम्ही हीं ठरवल आपण हीं फुलायचं, पण कस? मनसोक्त...स्वत:च्या ही क्षितिजा ला भरून टाकत, तना मनातून मस्त गिरक्या घेत.
पिलु..........
मी, पिलू आणि जॉगिंग ..........................
पिलू चा परिचय ( पिलू हा आमचा लाडका १ वर्षाचा भू भू आहे ,१ महिन्याचा होता तेव्हा भावाने आणले होते पाळायला ,त्याला पिलू म्हणायचो आणि तेच नाव पडल )
हिवाळ्यात जठराग्नी फारच क्रियाशील असतो (असे म्हणतात ),त्यामुळ जास्ती भूक लागते ,पण ह्या जास्तीच्या खावडी मूळ माझ वजन ३-४ किलो वाढल चांगलच ! आता काय करायचं ? जिमला जायचं ?
स्वातंत्र्य !!
स्वातंत्र्य !!
...`गेली सहा दशके आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत. आपली पिढी धन्य आहे, कारण आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आपण त्या सर्वांचे स्मरण करू या, आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना वंदन करू या... त्या पिढीच्या त्यागामुळेच आपण मुक्ततेचा आनंद मिळवला आहे'...
... प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत एक वक्ता भारावून भाषण करत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून स्वातंत्र्याच्या आनंदाची कारंजी फुलत होती, आणि श्रोतेही माना डोलावून त्याला सहमती देत होते...
पराला शुभेच्छा
मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर चे सर्वेसर्वा श्री पराजीराव साहेब पुणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव त्यांच्या पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो
-- शुभेच्छुक
मुन्ना, पप्पू, कालू, गोलू , टिपऱ्या, हल्या, छोटा छत्री, सुरा वस्तादी, इत्यादी इत्यादी ....
अवांतर
या छोटेखानी लेखाच प्रयोजन म्हणजे खालील प्रतिक्रिया:
http://www.misalpav.com/node/16488#comment-281900
मी केवळ छोटा डॉन या संपादाकानी ही प्रतीकिर्या लिहिली आहे म्हणून टार्गेट करत नाही. मी इथे बर्याच दिवसा पासून येत आहे आणि आधून मधून येणारी ही विनंती वजा धमकी बर्याच वेळेला पहिली आहे.
एका म्हातार्याची गोष्ट...
मनुष्य का जगतो याचे उत्तर भल्याभल्यांना सापडत नाही, कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना समाधानकारक उत्तर मिळेलच याची खात्री नाही. पण अशा स्थितीत कूणीतरी काहीतरी मनाशी करायचे ठरवुन त्याप्रमाणे आयुष्यभर वर्तन करतात. तोच त्यांचा जीवनाचा हेतु असतो. तेच त्यांच्या आयुष्याला त्यांच्या दृष्टीने सार्थकता देणारे असते. केलेले प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही. ज्यांच्या भाळी आपल्या आयुष्यात केलेल्या प्रयत्नांना आलेले फळ पहाण्याचे भाग्य असते अशी माणसे दैवी मानली जातात. पण असा प्रयत्न अयशस्वी असलेले त्या त्या समाजाला वाटत असलेल्या आदर्शांप्रमाणे वर्तन करत असतील तर ते त्या समाजाचे आदर्श होतात.
मिसळपाव