Skip to main content

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 14/03/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही.

भुत़काळ वि. भविष्य - १

लेखक किरन वनारे यांनी सोमवार, 14/03/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
भुत़काळ वि. भविष्य - १ बरयाचदा आपण विचार करतो कि उद्ययाचा दिवस हा आजपे़क्षा चान्गला असेल, काहितरि नविन घेउन येइल, आज असलेले प्रश्न उद्या पड्णार नाहित किवा सोड्वले जातिल. मग मार्ग मोकळे होतिल, सर्वे सुरळित होइल. असे असते तर हे मग जीवणच काय, पण खरे सान्गु या गोष्टि फक्त ऐकायला किवा बोलायलाच सोप्या आहेत; पण जो आनुभवतो (म्हणजे आपण सर्वेच) त्यालाच काटे टोचतात. तरिहिपण काहि हुषार लोके खुशाल सल्ले (न विचारता/मागता) देत फिरतात.

केळे-बेदाणे केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 14/03/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
..साहित्य: दीड कप मैदा १ कप साखर ३ पिकलेली केळी १/४ कप मऊ बटर किंवा तुप १ टीस्पून बेकिंग सोडा १/२ टीस्पून बेकिंग पावडर १ अंडे १/२ कप बेदाणे १ टीस्पून व्हॅनिला ईसेन्स पा़कृ: १८० डिग्री वर ओव्हन तापवायला ठेवावे.

मळ्यातील दर्शन

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 14/03/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
.............................. आज खूप महिन्यांनंतर माझी पाऊले आमच्या वाडीतल्या भैरोबाच्या विहीरीकडे वळली. पण मळ्यातील पाऊलवाटेवरून चालतांना मात्र मागे फ़िरून धूम ठोकाविशी वाटली. तरीही कुठल्याशा विचित्र ओढीने पाऊले मंत्रमुग्ध झाल्यासारखी विहीरीच्या दिशेने चालतच राहिली. हिला भैरोबाची विहीर नाव का पडले कोणास ठावूक. दाट झाडीमधे लपलेली आणि आजकाल वापरात नसलेली विहीर. आमच्या मळ्यात सगळीकडे कालव्याचे पाणी खेळवले होते. पुर्वी कालवा नव्हता तेव्हा पाण्यासाठीच बांधली असणार. कालवा आल्यानंतर देखील विहीरीच्या आजुबाजुच्या भाज्यांसाठी रहाटाने पाणी काढून देण्यासाठी विहीर पण वापरली जायची. आबांचा तो छंदच होता.

यु हॅव गॉट अ मेल..

लेखक नि३ यांनी सोमवार, 14/03/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी ऑफीस आलो.लॉग ईन करुन आउटलुक ऊघडले ...३५० अनरीड मेल ??? आमचा नवा नवा प्रोजेक्ट सुरु झाला रोज जास्तीत जास्त १०-१२ मेल आलेले असतात...३५० म्हणजे काही तरी मोठा प्रॉब्लेम झाला असावा हा विचार करुन थोडे सरसावुन मेल वाचायला बसलो.. हाय रे देवा..मुर्खतेचा कळस.. कंपनीत कुणाला तरी..एका सर्टीफीकेशन बद्द्ल माहीती हवी होती म्हणुन त्याने ईन्-जनरल एक मेल टाकला ..पण टु लिस्ट मधे गलतीच्या मिस्टेकने दुसरीच distribution list टाकली.

आरक्षण!

लेखक उगा काहितरीच यांनी सोमवार, 14/03/2011 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घ्या!! :) ) नुकताच महाराष्ट्र सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडनुकात महिलांना ५०% आरक्षण जाहीर केले. मिपाकरांना याबद्दल काय वाटते यासाठी हा लेखनप्रपंच !! अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का? आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ? महिलांचे समाजातिल स्थान सुधारले का ? बरं आनंदीबाई जोशी सारख्या काही महीला तर विना आरक्षणपण पुढे गेल्या .

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर - दुसऱया महायुध्दातील ज्युंच्या हत्यांकांडांचा संदर्भ

लेखक लांबदेव यांनी सोमवार, 14/03/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. खालील ब्लॉग मध्ये ही सर्व माहीती तसेच कवितेचा ह्या संदर्भातील असू शकणारा अर्थ यांचा समावेश केलेला आहे. खालील दुव्यावर टिचकी मारा पिंपात मेले ओल्या उंदिर