Skip to main content

चातुर्मास

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 23/03/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लीम बांधव रोजे ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगवेगळी बंधने असतात व ते ती पाळतात. क्रिश्चन बांधव लेत ठेवतात, त्या दिवसात त्यांच्या वर वेगळेगळी बंधने असतात व ते ती पाळतात. ते आपल्या दृष्टीकोनातून तरी सुद्धा COOL व MODERN राहातात व आपण हिंदू बांधवही त्यांच्या ह्या परंपरेचा आदरपुर्वक स्विकार करतो. आपल्यातली किती तरुण, बाल ह्यांना चातुर्मास काय आहे हे माहीत आहे व ते ठेवतात.

"मलाई मारके"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 23/03/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या १०० रुपयांमधील ७० रुपये कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्जावरील व्याजावर खर्च होत होत असून विकासकामांसाठी केवळ ३० रुपये उरत असल्याचे विदारक आर्थिक चित्र समोर आले आहे. पगारावरील खर्च अगोदरच अवाढव्य असताना सहाव्या वेतन आयोगाच्या अमलबजावणीमुळे राज्याच्या आस्थापना खर्चात मोठी वाढ झाली असून, वेतन, मजुरी, पेन्शनवरील खर्च चालू आर्थिक वर्षात ५१ हजार ७४० कोटी अपेक्षित आहे. तो एकूण महसुली जमेच्या ५३.३ टक्के आहे.

त्रैराशिक ....

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 23/03/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ... मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे आज उमगले खरं तर, जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे

पाणी

लेखक विकास यांनी बुधवार, 23/03/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.

हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/03/2011 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह.

परिश्रमांती रसग्रहण

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 22/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद.

पांढरा किडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा किडा तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो . गंगाधर मुटे ..........................................