काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो?
न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
का लढवय्या आता बदनाम होत आहे
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा आता दबला आवाज येथे
खोट्यांचाच येथे चित्कार आहे
------ शब्दमेघ
लाच का द्यावी?
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेणे ' हा हक्क आहे हे आपोआपच माहिती होते. रोज वर्तमानपत्रातून येणार्या बातम्या आणि रस्त्यावर वाहतूक पोलिसांबरोबर चालणारे व्यवहार पाहून आपली तशी पक्की खात्रीच होते.
प्राचीन वैदिक भूगोल व शहरे
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत.
वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.
नमस्कार,
या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
झरण
लिहीतो आहे ते चर्हाट आनि पाल्हाळच आहे
पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे .
म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे.
फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची.
तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं.
नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा
डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते.
मेघस्पर्षी
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.
मेघस्पर्षी
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.
मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी
नमस्कार,
२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.
या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे.
मिसळपाव