Skip to main content

अल्बनी ट्युलीप फेस्टिवल - २०११

लेखक लंबूटांग यांनी सोमवार, 09/05/2011 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वर्षी अल्बनी ट्युलिप फेस्टिवलचे ६३ वे वर्ष होते. गेल्यावर्षी पाऊस पडत असल्याने जाता आले नव्हते. ह्या वर्षी मात्र दोन्ही दिवस जाऊन मनसोक्त ट्युलिप्स पाहून घेतले. थोडा इतिहास. जुलै १, १९४८ साली तत्कालीन मेयर Erastus Corning दुसरा ह्याने city ordinance द्वारे ट्युलिप हे अल्बनीचे अधिकृत फूल म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर नेदरलँडची तत्कालीन राणी Wilhelmina of the Netherlands हिला विनंती केली की एखाद्या ट्युलिपला अल्बनीचे नाव द्यावे. तिनेही ह्या विनंतीला मान देत "Orange Wonder" ह्या ट्युलिपला अल्बनी ट्युलिप असे नाव दिले. ह्या प्रकारची ट्युलिप १८ इंच उंच वाढतात.

मुलीस पत्र

लेखक शुचि यांनी सोमवार, 09/05/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय रिया, हा हा म्हणता केवढी मोठी झालीस बाळा, तुला पंख फुटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं उद्या नोकरीनिमित्ताने दुसर्‍या देशात भुर्र उडून जाणार आहे. अशा वेळी तुझ्या या वेड्या आईचं मन सैरभैर होणं साहजिकच आहे. तुला मी देता येतील तितके चांगले संस्कार दिले, बाळकडू पाजलं, वेळोवेळी उपदेशाचे डोस दिले मग तुला आवडो अथवा न आवडो. पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या. मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते.

गाणी-गुणगुण-गाणी

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 09/05/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
खुप गाणी आपल्या मनाला भावतात..मग ती आपण कुठे थोडीशी कानावर आली की गुणगुणतो...तशातली माझी काही आवडती गाणी..तुम्हाला कोणती गाणी आवडतात गुणगुणायला?

चांगल्या मराठी शाळा नवी मुंबई

लेखक विक्रांत यांनी रविवार, 08/05/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीला धुळ्याहून नवी मुंबईत इयत्ता तिसरीत दाखल कारायचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत. आम्ही गेले १० दिवस चांगली शाळा शोधतोय. मात्र, अतिशय निराश करणारा अनुभव हाती येतोय. एकतर भाराभार इंग्रजी शाळा आहेत. पालकांनाच इंग्रजी माध्यमात मुलांना घालायचेय मग आम्ही मराठी शाळा काढून काय माशा मारु, हा संस्थाचालकांचा प्रश्न उचित आहे. लहान शहरात चान्गल्या शाळेचा प्रश्न फारसा सतावत नाही. धुळ्यात जयहिंद शाळेत ती होती. आता नवी मुंबईत पनवेल्पासून ऐरोलीपर्यंत किंवा थेट ठाण्यातही आम्हाला चालेल. प्रवेश कसा मिळवावा हा नंतरचा भाग आहे, पण चांगली शाळा कोणती, हा गहन प्रश्न आहे.

भरली वांगी (stuff brinjals)

लेखक पियुशा यांनी रविवार, 08/05/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
भरली वांगी (stuff brinjals) ( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.भु.दे.घे.) साहित्य : (वाटणा करिता )ओल्या नारळाचा कीस २ वाट्या ,धणेपूड १ मोठा स्पून ,१ स्पून मिरची पावडर,एक स्पून गरम मसाला ,आल ,लसून ,कोथिंबीर . वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या वांग्याला आडवे उभे काप देऊन हा मसाला त्या मध्ये भरा २ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,

वेगळ्या वाटेवरचा त्रिशूल कुलकर्णी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 08/05/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज माझ्या मित्राविषयी सर्वांना सांगावसं वाटलं म्हणून हा लेख. त्रिशूल कुलकर्णी विषयी नुकतीच पुणे सकाळने दखल घेऊन छान बातमी दिली आहे. http://72.78.249.107/Sakal/6May2011/Normal/PuneCity/Pune1Today/page11.h… हा त्रिशूल मला अनिल अवचटांच्या मुक्तांगण मध्ये पहिल्यांदा भेटला. खरं तर तेव्हा मनिष, योगेश ( अजानुकर्ण), अजीत आणि काही मुंबईचे लोक असे आम्ही भेटलो होतो. त्रिशूल पुढेही भेटत राहीला. त्याने एम टेकचा प्रकल्प किर्लोस्कर मध्ये केला.

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

लेखक विदेश यांनी रविवार, 08/05/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -
काव्यरस

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?