गृहिणीच "सोप्प "लाईफ
सकाळ झाली गजर वाजला, निवांत झोपलेला जीव माझा दचकून उठला ,
वाटल होत आज जरास उठाव उशिरा ,नवऱ्याच फर्मान होऊन जाऊदे आज बदाम शिरा ,
बेल एकदाच वाजवायची असते हे दुधवाल्याला कळत नाही ,
दार उघडेपर्यंत त्याच बेलवरच बोट ढळत नाही,
छोट्या सोन्याला उठवायची रोजची आहे कसरत
झोपेत असतो तरी नेम धरून लाथा मारतो ,
त्याला उठवायची नाही होत लवकर हिम्मत
सकाळच्या या गोंधळात छोटी छकुलीही उठते
माझ्याकडे इवले हात पसरत मम्मा मला घे न ,घे ना, करत माझ्यामागे फिरते ,
दोन चार दात तिच्या तोंडात तरी ब्रश करण्याची तिला घाई