पाचशेची वॉटर बॉटल!
मुलगी स्कूलमध्ये जाणार म्हणून आम्ही शालापूर्व शॉपींग करायला गेलो होतो. युनिफॉर्म, सैक वगैरे खरेदी केल्यावर वॉटर बॉटलचं नाव निघालं.
आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.'
त्यानं हसून एकदम ठेवणीतली वॉटरबॉटल काढली. म्हणाला- 'बेस्ट अॅटम आहे हा. अशी बॉटल हिच्या वर्गातल्या कुणाकडेच नसेल बघा. चांगली दोन तीन वर्ष जाईल. अहो स्टेफी ग्राफ वापरायची असल्या बॉटल्स. त्याच कंपनीची आहे ही, आणि विशेष म्हणजे गरम पाणी आठ तासापर्यँत गरमच राहतं, थंडपाणी थंडच राहतं.
मिसळपाव