Skip to main content

उपवासाचा बटाटावडा.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 20/06/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ. एक वाटी साबुदाण्याचे पिठ. तिन ते चार उकडलेले बटाटे. दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट. आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे) अर्धा चमचा लिंबाचा रस. मिठ व साखर चवीप्रमाणे. तेल्,जिरे फोडणीसाठी. कोथिंबीर. कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात जिरे फ

मेक्सिकन पुडींग

लेखक गुलतोरा यांनी सोमवार, 20/06/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय. कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत.

कथा एका यशोगाथेची - लघुकथा - जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी सोमवार, 20/06/2011 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी धंद्यात धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग काव्य, साहित्यात खटपट करून बघितली, पण त्याच्या मुक्तछंदाना कोणी काव्य म्हणेना, आणि यमकाला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे कथेचा ही विषय सुचेना. मग राजकारणात हातपाय चालवून बघितले आंदोलन, धरणे, उपोषण वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच प्रस्थापित व्हायचे होते. प्रस्थापितांशी लढण्यात त्याला आपली शक्ती घालवायची नव्हती. क्रांती झालीच तर ती त्याच्या जीवनात व्हायला हवी होती, उगाच लष्कराच्या भाक-या भाजण्याचा त्याच पिंड नव्हता.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.

निसर्गरम्य ताम्हीणी

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 20/06/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती.

सांग सखे ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 20/06/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
झालीस मोगरा तू अशी वासंतिक वयात बहरताना झालो सुवास मी हि तुझिया आसपास फिरताना .... सरला काळोख आयुश्यि तुझा सूर्य उगवताना उमलले अंगांग माझे सखे, तुझे सुर्यफुल होताना ... मन भाळले इतके सहज लडिवाळ तुझ्या शब्दांना मोहरलो सावलीत तुझ्या अस्तित्व माझे संपताना .... धरलास हात माझा अन विसरलो वाट चालताना खंतले न मन तुझे जराही तो असा अचानक सोडताना .... टाळले होतेस सगळे सहज जर मला एकटे सोडताना का पाहिले होतेस मग वळून? सासुराला जाताना .... सांग सखे ... आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... - विश्वेश

([ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीचे अभद्र प्रोडक्शन रिलिज)

लेखक धन्या यांनी सोमवार, 20/06/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १ जुलै २०११ रोजी हिंजवडी आयटी पार्कात फेज २ मध्ये प्रोडक्शन रिलिज होत असून हे प्रोडक्शन रिलिज क्लायंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेवलपमेंट टीम बरोबर केंद्र योग करते. त्यात क्लायंट बरोबर होणारा केंद्रयोग अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. याशिवाय हे प्रोडक्शन रिलिज पोस्ट डिप्लॉयमेंट सपोर्ट टीम बरोबर प्रतियुती करते.

[ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीची अभद्र अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 20/06/2011 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल. अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.