Skip to main content

१३ जुलै २०११ आणि नंतर...

लेखक सुशान्त यांनी गुरुवार, 14/07/2011 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
धडाड धुरळा उडतो गगनी पुन्हा भय जनी दाटते गा एकमेकां सारे सावरू धावती निस्तरू पाहती पुन्हा तेच सुटकेचा कोणी टाकती निःश्वास कुणाचा प्रवास संपलेला विव्हळत जागे कोणी वेदनांत कुठे डोळियांत पाणी साचे चित्रवाणीवर वृत्त साकळते जगाला कळते घडले ते परिस्थिती कोणी सांगे विवरून काय हो कारण घडे त्याचे निषेधाचे कुणी पेटवी पलिते शांत राखा माथे म्हणे कोणी कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक शूर नि सोशिक धैर्यवंत उलटते रात येता येता नीज पुन्हा नवा आज उजाडतो भयशंका मनी दाटल्या घेऊन चालती गा जन तीच वाट कुजबुज कुठे संताप थोडासा अगतिकचासा एक एक पोट शिकविते धैर्य ते अटळ अन्य काही बळ नाही तेथे

स्वतःचे मत मांडा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 14/07/2011 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे - प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते.

झटपट काजु-खोबर्‍याचे लाडू

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 14/07/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अडीच वाट्या डेसीकेटेड कोकोनट (सुक्या खोबर्‍याचा कीस) पाऊण वाटी कडेंन्सड मिल्क एक वाटी काजुपूड दीड चमचा साजुक तुप ३-४ चमचे पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, कडेंन्सड मिल्क असुनही थोडी पिठीसाखर घालावी लागते कारण सुक्या खोबर्‍यामुळे गोडवा कमी होतो). १ छोटा चमचा वेलचीपुड - पाकृ: तुपात डेसीकेटेड कोकोनट खमंग, चांगला परतून घेणे.

उपचार

लेखक जयनीत यांनी गुरुवार, 14/07/2011 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काय अर्थ आहे हया उपचाराचा? गोळया, औषधं ह्यानी ह्यांचीच चव रेंगाळते नुसती तोंडात! वरुन इंजेक्शन चा त्रास, पथ्य पथ्य म्हणून कही मनासारखं खायलाही बन्दी. कुठे बाहेर येणं जाणं ही बंद. मग हे सगळं कशासाठी? जगण्यासाठी? ह्याला काय जगणं म्हणायचं? बायको भाग्यवानच म्हणायची लवकरच सुटली ह्या सगळ्या जाचातून. त्यांना आज खुप जुने जुने मित्र आठवत होते अगदी लहान पणीचे शाळा कॉलेज मधले.

दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 14/07/2011 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :( आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले.

जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/07/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या. २६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो. पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते.

चला शिकागोला ...

लेखक मर्द मराठा यांनी गुरुवार, 14/07/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार जोडून सुट्टी आली की.. कपाटातल्या 'ब्यागा' उड्या मारायला लागतात...उगाचच कॅमेरा फ्लॅश मारतो आहे असे वाटायला लागते... पोटापाण्यासाठी मायदेश तात्पुरता सोडावा लागला तरी भटकण्याची खुमखुमी स्वस्थ घरी बसून देत नाही. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन ४ जुलै आणि तोही सोमवार म्हटल्यावर दोन आठवडे आधीच सहचारीणीशी मसलत करून गूगल नकाशावर स्थळ दर्शन सुरु झाले.... आम्ही राहतो रिचमंड, व्हर्जिनिया येथे गेली ३.५ वर्षे... त्यामुळे एक मोठ्ठ्या परिघातली सगळी शहरे, गावे, डोगंररांगा, समुद्रकिनारे पाहून झाले आहेत... म्हणून परिघाबाहेर जाणे क्रमप्राप्त होते... तेही विमान खर्चाची चाट खिशाला बसून न देता...

बटाटा वडा

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 14/07/2011 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बटाटे - ३ उकडलेले बेसन पीठ - १ वाटी कांदा - १ बडिशेप - १/२ चमचा आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिरव्या मिरच्या - २ ओवा - १/४ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १ चमचा कडिपत्ता - ४-५ तेल तळण्यासाठी मिठ चवीनुसार २ हिरव्या मिरच्या आणि लसुणची चटणी सजावटीसाठी कृती: १. कांदा बारीक चिरुन घ्यावा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घ्यावेत. २. हिरव्या मिरच्या व बडिशेप मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे. ३. कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कडिपत्ता टाकावा. ४. कडिपत्ता थोडा तळला गेल्यावर त्यावर कांदा २-३ मिनिट परतुन घ्यावा. ५.