Skip to main content

गोड गुन्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/09/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.

सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ|| समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१|| काल क्लासला का ग नाही आलीस? लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते; नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२|| कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून बरे द

स्पर्धा परिक्षा.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 04/09/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शिक्षणाला बहुपदर प्राप्त झाले आहेत, जसे एकिकडे सर्व मुले पास व्हावीत म्हणून सरसकट उत्तीर्ण करण्याचे शासकिय निर्देश, परिक्षाच टाळण्याचा कल त्याचबरोबर समांतर अश्या अनेक प्रवेशपरिक्षा असा घोळ चालू असतो. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंडळ आणि त्याच्या परिक्षा आणि त्याच बरोबर केंद्रिय मंडळाच्या परिक्षा आणि त्याचा धर्तीवर अनेक स्पर्धा परिक्षा विशेषतः त्यांचा अभ्यासक्रमाच्या धर्तीवर IIT सारख्या परिक्षा. या सर्वांचा विचार केला तर आयआयटी, चार्टेड अंकाँट्सच्या परिक्षेचा निकाल मात्र २ ते २१/२ टक्का इतकाच असतो.

सरंग्याची आमटी व तळलेले तारले.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-सरंग्याचे तुकडे. खवलेले खोबरे. हळद तिखट.(तब्येतीप्रमाणे) मिठ. एक चमचा धणे. ९-१० काळी मिरी. ५-६ लसूण पाकळ्या. कांदा.(अर्धा उभा चिरलेला वाटपासाठी व अर्धा बारीक चिरलेला फोडणीसाठी). चिंच. पाव चमचा तांदळाची पिठी किंवा कणिक. खोबरेल तेल फोडणीसाठी. कृती :-सरंग्याच्या तुकड्यांना अर्धा तास मिठ लावून ठेवावे. खोबर्‍यात बाकी साहित्य घ

बाप्पाचा प्रसाद्-पंचखाद्य.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात सध्या गणपतीची धामधूम सुरु आहे.रोज वेगवेगळा नैवेद्य.बाप्पाच्या आगमनाने घर भरलेलं आहे. पंचखाद्य हा बाप्पाचा खास प्रसाद्.आज त्याची रेसीपी. आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा.

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 04/09/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......

"बॉडीगार्ड"

लेखक स्पा यांनी रविवार, 04/09/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो, सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित

आंबाड्याचे रायते.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- ५-६ आंबाडे. लाल तिखट. गूळ. मिठ. मोहरी. एक वाटी खवलेले खोबरे. फोडणीसाठी तेल. कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी.

मोदक

लेखक निमिष ध. यांनी रविवार, 04/09/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मित्राकडे गणपतीची पूजा आहे आणि फ्रीज उघडून पहिला तर ओले खोबरे हाताशी होते मग म्हणालो व्हा सुरु आणि बनवा मोदक. आता पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे काही उकडीचे मोदक करून चौका मारायचा प्रयत्न नव्हता फक्त आपले साधे तळलेले मोदक केले. मि पा च्या सगळ्या बल्लवाचार्य आणि सुगरणीना नमस्कार करून पाककृती टाकतो. पहिल्यांदा एका मित्राला सकाळी सकाळी फोन करून उठाव आणि लवकर मदत करायला ये असे सांगा .. मग तो येण्याची वाट पहा, तो पर्यंत ओले खोबरे फ्रीज मधून काढून ठेवा. जर नारळ वापरणार असाल तर तो फोडून आणि खोवून घ्या. मी तरी मोदक कणकेचे साधे केले होते.