क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १
लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात.
एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली.
मिसळपाव
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.