Skip to main content

(तू तेव्हा तशी)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 02/03/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
.................. ................ ................ .................. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी हर प्रहराच्या, मोहाची तू नीट आधी, तू थेट साधी जळ्ळजळी गं घशाची तू जुनी जुनी, तू जास्तच गुणी चखण्याच्या गं जीभेची तू हिरवी लेब्ली, तू कृष्ण डब्ली तू मस्ती जास्ती घोटांची jw1 jw2 तू तेव

डेली सोप मालिका कशी बनते .

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 02/03/2012 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले. १ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते .

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

ईमानदारीच्या आईचा घो?

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/03/2012 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे नेहमी येणारे आणि मला नुकतेच जरा जास्तच आलेले अनुभव. भ्रष्टाचार, सरकारी नोकरांची मनमानी, राजकारणी नेत्यांची लाज वाटायला लावणारी कृत्ये हे सर्व तर आहेच पण आपण स्वतः देखील कितपत ईमानदारीने वागतो याचा एक आढावा म्हणा हवं तर. एकच प्रकरण - मला घर विकत घ्यायचं होतं. शोधाशोध सुरु झाली.. सर्वात पहिले मनात आलं ते म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती, खरं कारण नुसतच डिमांड सप्लाय गणित आहे का? माझ्या मते नाही..

गुगल ऑनलाईन अर्निंग जॉब

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 02/03/2012 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
कित्येक दिवसांपासून गुगलवर मेक मनी कि अर्न मनी ऑनलाईन अशा अ‍ॅड येत आहेत. त्यातील काही अ‍ॅड खुद्द गुगल देत आहे असे दाखवले जात आहे. जाहीरातीच्या चित्रात कोणी एक परप्रांतातील सुंदर (आंटी) बाला आपल्या हातात डॉलरमध्ये अमाऊंट दर्शवलेला चेक दाखवत एक मंद स्मित करत आहे असे दाखवले जातेय. (तिच्या चेहर्‍यावर जाऊ नका म्हणजे झालं ;) ) तर त्या जाहीरातीनुसार तुंम्ही घरबसल्या नेटवर कमाई करु शकता आणि तिही डॉलरमध्ये! त्यासाठी तुंम्हाला आठवड्याचे फक्त काही तासच नेटवर अ‍ॅड ब्राऊसिंगचे काम करायचे असते ज्याचे तुंम्हाला महीन्याचे अंदाजे ६,००० ते ८,००० डॉलर मिळतात.

कॉर्बेट, कौसानी, नैनिताल - भाग १

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 01/03/2012 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
एडवर्ड जेम्स जिम कॉर्बेट अर्थात जिम कॉर्बेट शिकार्‍यांमधला सचिन तेंडुलकर होता. (तेंडुलकर क्रिकेटरांमधला जिम कॉर्बेट होता असे म्हणणे खरे म्हणजे जास्त सयुक्तिक आहे पण असे मिपावर लिहिणे फारसे शहाणपणाचे होणार नाही.). या माणसाने भारतीय वाघांवर फार मोठे उपकारही केले आहेत आणि अपकारही. आयुष्याच्या सुरुवातीस जिम कॉर्बेट शुद्ध शिकारी होता. त्याने ढीगाने वाघ मारले. त्यावर रसाळ भाषेत, उत्कंठावर्धक पुस्तकेही लिहिली. Leopard of Rudraprayag, Maneaters of Kumaon आणि देवळाचा वाघ (हे मी मराठीतुनच वाचले आहे फक्त) ही त्याची पुस्तके तर निव्वळ वाचन सुख.