Skip to main content

आवडलेले क्लिक्स ..

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 06/03/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही आवडलेले क्लिक्स ,छायाचित्रकाराच्या परवानगीने ,त्यांच्या नावासहित ... छायाचित्रकार : सुधिर क्षीरसागर . स्थळ : युरोप . . .

वसई किल्ला, मिपाकरांसोबत

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/03/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
वसई किल्ला- तीन्ही बाजूंनी पाणी व जमिनीवरून चिंचोळा रस्ता अशी याची रचना. मूळ मराठी सरदाराने उभारलेला व पुढे गुजराथच्या सुलतानाच्या ताब्यात आलेला व त्यापुढे पोर्तुगीजांनी बळकावलेला व त्याची भक्कम पुनर्बांधणी केलेला एक अभेद्य दुर्ग. पुढे चिमाजीअप्पांच्या अतुलनीय शौर्याने हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. रविवार करावे लागणारे हापिसचे काम ऐनवेळी पुढे ढकलेले गेल्यामुळे माझा मुंबई प्रवासाचा मार्ग सुकर झाला व मी आणि मोदक पिंपरीला भल्या सकाळी सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढलो, सूड पुण्याहून बसलेलाच होता. तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या. सूड बदलापूरला जाऊन ठाण्याला आम्हाला जॉईन होणार होता.

कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 06/03/2012 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत. एकदम पोनी घालण्याइतके ते मोठे नाहीत पण शर्टच्या कॉलरच्या खाली गेलेले आहेत. ते तसेच अजून कंटाळा येईपर्यंत ठेवण्याची इच्छा आहे. मी माझ्या डोक्याच्या केसांना अगदी दररोज तेल लावत नाही. आठवड्यातून दोनदा लावतो. एखादे दिवशी किंवा ते केस धुतल्यानंतर कोरडे दिसतात. आता माझा प्रश्न: असे कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा? जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात. केस मऊ, उडते ठेवून ओले दिसण्यासाठी काही क्रिम आहे काय? असल्यास ते क्रिम कोणत्या ब्रांडचे आहे?

आधी(चं) हौस त्यात पडला पाऊस...

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 06/03/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागे दौलताबादाला जाऊन आल्यापासून माझा धाकटा जरा इतिहासमय झाला होता. तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकणे हा त्याचा आवडता छंद बनला. यू ट्यूब वर जाऊन महाराजांचे ऍनिमेशनपट पाहणे, कलर्सवर चालू असलेली महाराजांची सीरियल (अतिशय टुकार असलेली) पाहणे ह्या गोष्टी तो अगदी मावळ्याच्या निष्ठेने करतो. 'कायद्याचे बोला' बघितल्यापासून माझी मोठा मुलगा मकरंद अनासपुरे, आपला मक्या हो, त्याचा प्रचंड फॅन झाला आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि गावरान भाषेचा तडका त्याला फारच आवडतो, म्हणजे मलाही बरं का. विशेषतः म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रभावी वापर तर मला भयंकर आवडतो.

तोरण्याविषयी माहिती हवी आहे

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 05/03/2012 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही मित्रमंडळी मागे प्रतापगडावर जाणार होतो, त्यासंबंधी फारच उपयुक्त माहिती आपण दिली होती. आता अनेक चर्चांनंतर तोरणा किल्ल्याला जायचे ठरत आहे. त्याबाबत मला काही माहिती हवी आहे काही मिळाली आहे. तोरणा किल्ला हा पुण्यापासून ५५ किमी अंतरावर आहे एस टी बस वेल्हा या गावापर्यंत जाते. पुण्याहून साधारण २ तास लागतात. तेथे जाऊन रात्री मुक्काम करण्याचा बेत आहे. आता प्रश्न असा की तोरण्याला वरती रहायची काही सोय आहे का ? वरती पिण्याचे पाणी मिळेल का ? वरती जेवणाची काही सोय आहे का ? नसल्यास खाली एखादी चांगली खाणावळ आहे का ?(हाय फाय हॉटेल नकोच आहे) कुणी खाणावळ वाले १५, २० जणांचे जेवण वरती

"क्रांती" - कर ले घडी दो घडी!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 05/03/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट.

आजची रात्र...

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 05/03/2012 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुटुनी चांदण्या रातीतून, पहाट शिरतसे नभात या तरूण आहे मात्र अजूनी, रात्र आजच्या क्षणांत या मनातले वादळ तुझ्या-माझ्या, उतरे मद्याच्या प्याल्यांत या एक एक घोट फिरूनी, काहूरतो शरीरात या न आहे न होती कधी, तमा लोकांची मला नाही तरी काय मिळाले, त्यांच्यासवे जगण्यात या दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या चार भिंतीं पलिकडे, थोपविलेस तू 'त्या' वणव्याला सखया आज राख होऊदे, जगावेगळ्या जळण्यात या आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या

कृपाशंकर सिंह यांच्या पुस्तकाला शीर्षक सुचवा

लेखक सू डोकू यांनी सोमवार, 05/03/2012 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कृपाशंकर सिंह यांना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केल्याचा साक्षात्कार नुकताच झाला असून, या आपल्या जीवनातल्या वाटचालीविषयी त्यांनी एक पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलण्यात राजकारणांत आयुष्य घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच, आयुष्यभर लोकलच्या हँडलला लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जे आजपर्यंत कधी जमले नाही ते कृपाशंकर सिंह यांना कसे शक्य झाले याचे रहस्य या पुस्तकातून उलगडले जाणार आहे. ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे हक्क त्वरित मिळविले आहेत.