Skip to main content

बाटली

लेखक हर्षद आनंदी यांनी शनिवार, 10/03/2012 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
फोडली आहे बाटली .. बाटली तोडली का कधी.. नसेल तोडली तर तोडून बघा.. फोडून बघा .. बाटली तेलाची.. हो हो तेलाची.. .. एक बाटली कळकटलेली, मळकटलेली .. किंचित राकट त्या हातात घट्ट धरलेली.. जणू काही स्वप्ने गाठीशी बांधलेली.. फोडलीस तू म्हणून रागानी ती पाही .. मटकन बसून खाली.. तुकडे गोळा करी.. अर्ध्या तुकड्यात त्या वाचले होते तेल काही.. उरलेले ती बोटांनी गोळा करी.. विखुरलेली स्वप्ने वाकुल्या दाखवी.. मुक्या त्या डोळ्यात होता कल्लोळ..लागली काच रक्त वाहे भळभळ .. तमा न कशाची तिला.. हात तसाच पदरास पुसला.. परत सुरु खेळ तिचा.. भू पण स्त्री.. ती पण हट्टी .. तेल सारे सोडेल कशी.. तिचा हिस्सा तिने घेतलाच..

धुलिवंदन

लेखक प्रसाद प्रसाद यांनी शनिवार, 10/03/2012 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
७ तारखेला होळी झाली दुसरे दिवशी धुलिवंदन. सहज विचार करता धुलिवंदन हा शब्द कसा आला असा प्रश्न पडला. जालावर शोध घेतला पण काही चांगली माहिती मिळाली नाही. धुलिवंदन ह्या शब्दामागे काही लोककथा वगैरे आहे का? सहज पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ना गवसल्याने धुलिवंदनाचा दिवस झाल्यावर हे आमचे वरातीमागून घोडे.

जॉय मुखर्जींना विनम्र अभिवादन..!

लेखक कॉमन मॅन यांनी शनिवार, 10/03/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अतिशय आवडते सिनेकलावंत जॉय मुखर्जी यांना काल देवाज्ञा झाली. १९६० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांतून चांगली कामे केली. त्यांना गाणीही खूप छान मिळाली. त्यांच्यावर आणि साधनावर चित्रित झालेले 'आप यू ही अगर हमसे मिलते रहे..' हे खूप छान गाणे आत्ता आम्हाला या निमित्ताने आठवत आहे. जॉय मुखर्जींच्या आत्म्यास सद्गती मिळावी, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.. -- कॉमॅ.

'नट्स अँड बोल्ट्स'

लेखक Nile यांनी शनिवार, 10/03/2012 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आदिजोशी यांचे नट-बोल्ट तत्वज्ञान वाचले आणि बुद्धा बोधीवृक्षाखाली जे काय झालं असेल ते आम्हाला झालं. आधी आपण जोशींचे थोर विचार ऐकूयात.
एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?
(दुवा) किती थोर नै! म्हणून आम्ही निसर्गाचा अभ्यास सुरु केला आणि आम्हाला काही धक्कादायक निरिक्षणं मिळाली. ती निरीक्षणं आम्ही तुमच्यासमोर चित्ररुपातच देऊ इच्छितो. १.

शेअर बाजार हा जुगार आहे कि पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग

लेखक निश यांनी शुक्रवार, 09/03/2012 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
खर म्हंजे आपण जे म्हणतो कि शेअर बाजार हा जुगार आहे हे कितपत खर आहे? कारण शेअर बाजारातिल काहि कंपन्या ह्या खरच खुप चांगले परतावा देतात आपल्या गुंतवणु़कीवर असा अनुभव आहे. कित्येक कंपन्या ह्या अतिशय चांगला परतावा सतत देतात. चांगल्या कंपनी कशा निवडाव्यात ह्या बद्दल काहि नियम आहेत का असल्यास ते कोणते ? जुगार जर आहे अस मानल तर सरकार ह्यावर बंदि का घालत नाहि उलट शेअर बाजारात अजुन गुंतवणुक का करायला प्रोत्साहन देत आहे लोकाना ? शेअर बाजारातून आम जनतेचा खरच फायदा होतो का ? कारण बहुतेक जण बाजारात तेजि असताना खरेदी करतात व बाजारात मंदी आलि कि नुकसान सोसतात म्हणुन तो जुगार आहे का ?

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..