आनंद, सुख, जगणे इ इ
नमस्कार मंडळी. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! सण आनंदाचा जावो. नववर्षात आनंद, सुख, संपत्ती, समृद्धी लाभो.
पैसा व सुख असे शब्द ऐकले की एखाद्याला फक्त पैसा मोजणारी, कालच्यापेक्षा आज आधीक अशी जीडीपीचा उदो उदो करणारी पाश्चात्य संस्कृती आठवत असेल तर एखाद्याला भूतानच्या राजाने प्रसिद्ध केलेली ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संज्ञा पण आठवत असेल. आता आपण तत्त्ववेत्या भारतीयांना सुख हे मानण्यात असते इतके माहीत असतेच. चला मग सुखाचे ते नेमके मानले गेलेले क्षण कोणते त्याची यादी करुया.
मिसळपाव
