Skip to main content

भय इथले संपत नाही.. रसग्रहण

लेखक गणेशा यांनी बुधवार, 28/03/2012 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेससारख्या श्रेष्ठ कविच्या कवितेचा अर्थ आपण आपल्या सामान्य सीमित जीवनाच्या अनुभवांच्या चौकटीतच शोधायला निघतो..... तिथे अर्थ अपुरा राहू शकतो कारण कदाचित अशा कविच्या अनुभवाचे, कल्पनेचे आणि प्रतिभेचे क्षितिज नक्कीच आपल्यापेक्षा अधिक विस्तृत असतं.... !!!
काव्यरस

मंद तारका

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 27/03/2012 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मंद तारका त्या तेजाळती नभी विश्वाची दिवाळी सदोदित । तुझा सहवास करे उल्हसित नको तो विरह जीवघेणा । अथांग सागर जैसे तुझे मन निराळेच पैलू दावितसे । तुझी-माझी साथ हातामध्ये हात घालू गगनास गवसणी । टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.
काव्यरस

(हुच्च माझा बोका)

लेखक सूड यांनी मंगळवार, 27/03/2012 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा- शीर्षकगीत काही न चाहूल होती..माझिया पावली मी जरा गुरगुरले अन दूर गेली छोटुकली चुलीवरी होते पय..त्यास दाट होती साय हावर्‍या मनात माझ्या..भरे तयाचा विषय थबकले उंबर्‍यात मी..येई मालकीण आत जरा धावले कडेने..फेकिले तो फळकूट मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका

तव चिंतनातही मी

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 27/03/2012 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
तव चिंतनातही मी तव चिंतनातही मी, बाहुंतही तव मीच मी \-२ माझीच दोन्ही घरे, ए प्रियकरा ही इथे जणू दिप्ती पहाटेसची, नेत्रांत तव हरपली उघड लोचने तू तुझी, पुतळ्यांत असणार मी मी आहे, कला ज्या स्थळी, नेत्रांत तुझिया उभी मदनमस्त चंचल ही सांज, संकेतच देते तुला दगडांत कर शायरी, वंदन मी करते तुला तू अससी, तेथ मी, नाचे ही भू-आसमान शांतारामांच्या रोमांचक स्वप्नाला हसरत जयपुरींनी शब्द दिले तेव्हा हे गीत निर्माण झाले. उघडच आहे की ते माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे. त्याला वाण नाही तर नाही पण गुण तरी लागला आहे की नाही, हे मात्र तुम्हीच सांगू शकाल.
काव्यरस

वाळ्याचे पडदे

लेखक अन्तु बर्वा यांनी मंगळवार, 27/03/2012 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणीचा उन्हाळा लै भारी असायचा. शाळेला सुट्टी. सकाळी ७ वाजता शेतातल्या आंब्यांचा 'ब्रेकफास्ट' करायचा आणि क्रिकेट खेळायला पळायच! ११.३०-१२ ला घरी येऊन मस्त थंड पाण्यानी आंघोळ करायची. नंतर आमरस-पोळी वर यथेच्छ ताव मारायचा! दुपारी परत बैठे खेळ. गोट्या, चिंचोके, पत्ते. ४ वाजता परत घरी येऊन काहीतरी (बहुदा थंड दही-भात आणी शेन्ग्दाण्याची चटनी ) खायच आणि परत पळायच क्रिकेटखेळायलाअगदी संध्याकाळी ७ पर्यंत. काय दिवस होते ते! त्यावेळी आमच्याकडे आजोबा त्यांच्या खोलीत खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून घेत असत उन्हाळ्यात. दुपारच्या झोपेआधी त्यापडद्यांवरपाणी मारले जाई. अहाहा!

हाथरुणात शिरताना

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 27/03/2012 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या 'चांदण्यात फिरताना' ह्या अप्रतीम गीताचे एक वास्तववादी / का विसंवादी स्वैर विडंबन) हाथरुणात शिरताना डसला मज डास घरा नाही रॅकेटही सॉकेटही ठेचण्यास साचलेल्या डबक्यातून आला तो एकटाच दूर थवे (ईतर) मच्छरांचे आले मागे कधीच वेळ माझी निजायची पण सारे जाणतात सांग मेल्या तुझ्या संग कशी पुरी करू निज तुज चाले ओडोमस अन भावे ऑलाउट श्वास तुझा गुणगुण डंख तुझा लालेलाल चु भू द्या घ्या

पाणी, नळातलं आणि डोळ्यातलं!

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 27/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच (बहुधा २२ मार्च) जागतिक जलदिन होऊन गेला असे वाचनात आले. बाकी हे असले दिन (जलदिन, एड्स दिन, पर्यावरण दिन, वगैरे) दुर्दैवाने फक्त वाचनातच येतात. महिला दिनाला बाजारपेठ आहे; रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, वगैरे नाजूक दिवसांनादेखील भरभक्कम (पण ज्वलनशील) बाजारपेठ आहे. थोडंफार असं नशीब मातृदिनाला पण लाभलेलं आहे. दागिन्यांच्या पानभर जाहिराती देऊन "सेलिब्रेट द वुमन इन युअर लाईफ" किंवा "मेक युअर वाईफ फील लाईक अ क्वीन" सारख्या भावनिक आव्हान करणार्‍या जाहिराती बघून या दिवसांचं महत्व दागिन्यांच्या, हॉटेल्सच्या, गिफ्टसच्या कंपन्यांनी किती खुबीने वाढवलंय हे लक्षात येतं.

साबुदाणा खरेदी...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 27/03/2012 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला उपास करता येत नाही..अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत... पण माझ्या बायकोला वाटते की मी खूप धार्मिक आहे...ह्याचे कारण म्हणजे आमची "साबुदाणा खरेदी"... बायको बरोबर खरेदी करणेआणि तो अनुभव काहीवर्षांनी सांगणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असते... बायको आणि नवरा ह्या व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात... गालावरून हळूच फिरणारा चंद्रा सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी आपल्या पाठीवर कसा तळपत्या वज्रा सारखा आदळतो, हे समजायला (नव्हे अनुभवायला) लग्नच करावे लागते. लग्नापूर्वी माझी खरेदी ७/८ मिनिटात होत असे..आपली कुवत आणि गरज बघून खरेद

मी वळूनी हासले - चुकले जरासे

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 27/03/2012 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 27/03/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशा खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. परवा रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द फडात तमाशा पहायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते तिकिटं काढायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या 'साखरभाताला' विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला जत्रेच्या सुपारीची आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरंच नवल वाटल की जर जत्रेत फड भरवून ह्या मातीची संस्कृती जपली जात असेल तर मग आपली संस्कृती फक्त तमाशांवर चालायला हवी. नाचव बाई जप संस्कृती.