Skip to main content

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

भ्रमणकक्षा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 08/04/2012 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
लाल मुंडासे घातलेल्या धनगराच्या पोराने आपली मेंढरे पुढे काढण्यासाठी हाळी घालावी तसे त्या कंडक्टरने ८ जानेवारी १९८० रोजी त्या बसमधील मेंढरांना हाळी दिली “ चला स्वारगेट्ला उतरणार्‍यांना पुढे येऊ देत. चला ! लवकर ! टिंग टिंग आवाज झाला आणि बस थांबल्यावर अनेक मेंढराच्या मागे अजित प्रधान अलगद त्या बसमधून जमिनीवर आला. शांतपणे त्याने रिक्षाच्या दिशेने पावले टाकली. त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या शब्दकोशात “कदाचित” हा शब्दच नव्हता असे म्हणायला हरकत नाही. कदाचित असे होईल, कदाचित तसे होईल, कदाचित रिक्षा मिळणार नाही, कदाचित मिळेल असे अनिश्चित त्याच्या आयुष्यात काही राहिलेले नव्हते.

अंग कोरणे

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 08/04/2012 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गोव्याला गेलो होतो.काही मित्रांनी तिथे जाऊन अंग कोरुन आल्याचं पाहिलं होतं.म्हटलं आपणही ट्राय मारुया. माझा पहिला टॅटू

कोचिंग क्लासेस -२

लेखक पैसा यांनी रविवार, 08/04/2012 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां.

निजेला लॅपटॉप

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 08/04/2012 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

जातक कथा

लेखक यकु यांनी शनिवार, 07/04/2012 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य असलेल्या स्थळी बराच काळ वास घडत आहें; तेथून ही 'जातक कथा' जशीच्या तशी उचलून येथें ठेविली आहे; कां की याबद्दल माहिती नसलेल्या आमच्या वाचकांना धर्मानंद कोसंबींच्या या स्थळाची माहिती व्हावी व जुन्या मराठी भाषेच्या उत्तम शैलीत जिज्ञासूंना धर्मानंद कोसंबी व बौद्ध वाङमय वाचावयास सापडावें.

व्योमकेश बक्शी आणि त्याच्या रहस्यकथा

लेखक प्राध्यापक यांनी शनिवार, 07/04/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा चा सभासद झाल्यानंतर प्रथमच लेखन करतोय काल व्योमकेश बक्शी आणि त्याच्या रहस्यकथा हे अशोक जैन यानी अनुवादीत केलेले पुस्तक वाचण्यात आले,आणी जुना काळ आढवला,लहान असताना दुरदर्शन वर या पुस्तकावर अतिशय सुरेख मालिका लागायची ,जे मि.पा. कर आता ३६ च्या पुढे आहेत त्याना नक्कीच आटवत असेल . या निमीत्तने एक जाणवले कि आपल्याकडे अश्या रहस्यकथा बाबुराव अर्नाळ्कर व सुहास शीरवळकर यांचा सन्माननीय अपवाद वगळ्ता फारश्या नाहिआहे,वरील दोघांशीवाय आणखी कोणी लेखक मिपा करांना माहिति असल्यास क्रुपया कळवावे.