Skip to main content

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

मनाचे श्लोक एम.पि.थ्री मध्ये हवे आहे...

लेखक चिम् चिम् मामा यांनी मंगळवार, 17/04/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे श्लोक एम.पि.थ्री मध्ये हवे आहे... मला कुठल्या संकेत स्थळावरुन डाउनलोड करता येइल?

नॉर्थ कॅरोलिना झू

लेखक Pearl यांनी मंगळवार, 17/04/2012 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस मनात होते नॉर्थ कॅरोलिना झू पहायला जाउया, पिल्लूला पण मजा येईल झू पहायला. पण हिवाळ्यामुळे थांबावं लागत होतं. खूप थंडी ,बोचरं वारं आणि लहान दिवस यामुळं इतके दिवस हा बेत पुढे ढकलला जात होता.पण एप्रिलमध्ये टेंपरेचर चांगल सुधारू लागलं, पारा वर चढू लागला आणि दिवसही छान मोठा होत गेला. मग वेदर पाहिलं आणि एकदा ठरवलं की या विकांताला झू पहायचं. झू ची साइट पाहिली. अगदी सविस्तर माहिती दिली होती. इथलं हे आवडतं आपल्याला.

अस्तंगत होणारा वडिलधार्‍या माणसांचा मान आणि सौजन्य!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 17/04/2012 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/esakal/20120417/5683849096694387473.htm पुण्यात भर लक्ष्मी रस्त्यावर एक तरुण फुटपाथ आपले वाहन फुटपाथवार चढवून, फुटपाथ अडवून बसला होता. एका ६९ वर्षीय महिलेने त्याला जाब विचारल्यावर बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान त्या ज्येष्ठ महिलेला मारहाणीत झाले. नंतर पोलिसांकडे तक्रार करायचा प्रयत्न केल्यावर टोलवाटोलवी, त्या पोलिसस्टेशनला जा, उलटा त्या महिलेलाच उपदेश वगैरे नेहमीप्रमाणेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" धोरणाचे अनुभव आले.

राधा

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 17/04/2012 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा तू म्हणालीस "मी राधा आहे" त्या नंतर तुला पिचताना पाहत आलो... पदरा खाली मांजरांना जपताना पाहत आलो तुझ्या मिठीचे कित्येक रस्ते देवळात गेले... कित्येक रस्ते निनावी पायऱ्यांच्या महालात गेले... डोळ्याभोवती वर्तुळे आली कित्येक दिवस वर्तुळातून फिरत किडके दात कोरण्यात गेले

उबंटूचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!

लेखक यकु यांनी सोमवार, 16/04/2012 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
विंडोज ७ नीट सुरु असतानाही मी माझ्या अंक उच्चावर ( लॅपटॉप हो! ) उबंटू ११.१० ही आवृत्ती स्थापित केली होती (झक मारलीन उबंटू इन्स्टॉल केलं असं झालंय, कारण पूर्ण सिस्टीम क्लीन करुनही उबंटूमुळं कोणतीही सिस्टिम इन्स्टॉल होऊ शकत नाहीय म्हणे :( ) त्यात पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही प्रणाली व्यवस्थित चालू होत्या. पण गेल्या काही दिवसात विंडोज ७ भ्रष्ट झाले, आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी उबंटूनेही मान टाकली. आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक घनपाठी इंजिनियर (पक्षी लॅपटॉप दुरुस्तीगीर, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि लॅपटॉप समोर अनुष्टाणाला बसवला.

खिडकीतुन पाहताना...

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 16/04/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया... मग करायचं तरी काय ? मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच... कसं ? तर ते असं... १) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ? २)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही !

अभीभी याद है.. 'तुम्हे याद होगा' ...!

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 16/04/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणती दुपार. जेवण अंगावर आलेले. बारीक स्वरात एफ एमची निवेदिका कानाशी माशी गुणगुणल्याप्रमाणे गुणगुणत होती. त्याचा अर्थ काही मनात शिरत नव्हता. थोडा वेळ गुणगुणून झाल्यावर थकून की काय टी एकदम गप्पा झाली अन एक ग्याप.

<<बिन-पाण्याची दाढी>>

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 16/04/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://misalpav.com/node/21389 "तुझ्या हाती ब्लेड आहे" खुंट, खुंटच राहतात, तेव्हा वेदना वळावते, घोटतात नाजूक गालही! चेहरा जळत असला, तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!! फक्त असे केश उमलत जाऊन, 'फेस' मुळातुन सुरकुतू नये, इतकंच जपतोय.. शेवटी, बिन-पाण्याची ही 'दाढी जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला गोरेपणा....!! -डहाणु
काव्यरस