Skip to main content

कॅमेरा कोणता खरेदी करायचा ?कॉम्पॅक्ट की एस एल आर ?

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 02/05/2012 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला प्रकाशलेखनाची उर्फ फोटोग्राफीची उर्फ छायाचित्रणाची आवड बहुतेकाना असते. त्यापासून मिळणार्‍या फोटोच्या गुणवत्तेची प्रत्येकाची अपेक्षाही वेगवेगळी असते व या छंदावर पैसा तरी किती उधळावा याचीही प्रत्येकाची तयारी वेगवेगळी असते. बाजारात फक्त ४ एक्स च्या डिजिटल झूमपासून ते ४२ एक्स च्या ऑप्टीकल झूमपर्यंत आवाका असलेले कॅमेरे विकत मिळतात. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे कॅमेरे मिळतात . ते प्रकार म्हणजे १) कॉम्पॅक्ट कॅमेरे २) एस एल आर उर्फ सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे .

का रे असा अबोल तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 02/05/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
20080414 का रे असा अबोल तू तीः का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना । शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥ तोः तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा । सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥ तीः स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार । मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥ तोः वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके । जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात. ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही. मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे. ही कविता माझीच आहे. हा कुठल्याही गीताचा अनुवाद नाही.
काव्यरस

जुळले अजून आहे

लेखक जयवी यांनी बुधवार, 02/05/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सरले बरेच काही, उरले अजून आहे कोठेतरी जरासे, जुळले अजून आहे वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, इमले अजून आहे अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे जयश्री
काव्यरस

वेलकम टु इंडिगो...

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 01/05/2012 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या विमानकंपन्यांचे धोरण पर्यटन व्यावसायिकापेक्षा थेट ग्राहकाला आकर्षित करण्याचे दिसते. प्रवासभाडे आणि सुविधा हे दोन्ही जर ग्राहकाने विमानकंपनिच्या संकेतस्थाळावर जाऊन थेट आरक्षण केले तर पर्यटन संस्थेपेक्षा बरे मिळते असा सध्या माझाही अनुभव आहे. चिरंजिवांसाठी इंडिगो एअरलाइन्समध्ये थेट आरक्षण करताना आलेला माझा हा अनुभव. कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल. इंडिगोच्या संकेतस्थळावर तिकिट बनविताना गाडं एका ठिकाणी अडलं. मी तिकिट प्रकल्प तिथेच थांबवुन पडद्यावर संकेतस्थळ खुले ठेवुन इंडिगोच्या ग्राहकसेवेशी संपर्क साधला. तिकिटसेवा बहुधा बाहेरुन घेतलेली असावी. असो.

"हा भारत माझा" - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 01/05/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट मी काही दिवसांपूर्वी आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिला होता. आता दि. ४ मे ला प्रदर्शित होत आहे. म्हणून हे परीक्षण मुद्दाम देत आहे. "हा भारत माझा" हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिंबा देणारे लोक स्वतः जेथे तेथे नियम तोडण्यात पुढे असतात अशी टीका कायम केली जाते. या चित्रपटाचा विषय हाच आहे.

कणकेचे लाडू

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 01/05/2012 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१) एक वाटी कणीक. २)एक वाटी गुळ. ३)अर्धी वाटी तूप. ४)पाव वाटी किसलेले सुके खोबरे. ५)एक चमचा खसखस. ५)पाव चमचा वेलचीपूड. कृती :-प्रथम कणीक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे व हातानेच त्याचा चुरा करावा.खसखस थोड्या तुपात भाजून घ्यावी.एका भांड्यात जूळ घेऊन त्यावर पाणी शिंपडून त्याचा दोन तारी पाक करावा.त्यात खोबरे,खसखस,वेलचीपूड व कणीक घालावी.सर्व मिश्रण नीट एकत्र करावे व लाडू वळावे.

एनर्जी व मॅटर

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 01/05/2012 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही. आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली. एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का. मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले.