Skip to main content

सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 22/05/2012 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्‍या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला.

समाजसेवा

लेखक विकास यांनी सोमवार, 21/05/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" या आमीर खानच्या मालीकेवरून टिका करणार्‍यांचा एक मुद्दा हा त्या मालीकेतून होणार्‍या उत्पन्नाविषयी आहे. अंदाजे तीन कोटींची मालीका तयार करून आमीर केवळ पैसे मिळवतोय आणि दुसरीकडे जनजागृती/लोकशिक्षण/सामाजीक प्रश्नांस वाचा फोडणे, जे काही असेल त्याचा नुसता देखावा करत आहे... मला तसे वाटत नाही हे त्या चर्चांमधून सांगून झाले आहेच तसेच इतरांचे पण या मालीकेसंदर्भात आणि आमीरसंदर्भात समान अथवा विरोधी विचार समजले आहेत. त्यामुळे ह्या चर्चेचा विषय कृपया आमीर कस्सा चांगला आहे अथवा किती चालू आहे या विषयी नसावा. त्याच्याशी आपले कुठल्याच अर्थाने देणेघेणे नाही... त्यावर चर्चा नको.

टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 21/05/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार.. माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती, आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत....

मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/05/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले. इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात. लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात. प्रचंड संख्येने हजर असतात. मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात.

डिस्को-क्वीन - डॉना समर

लेखक प्रास यांनी सोमवार, 21/05/2012 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल नेट वर फेरफटका मारताना अचानक बातमी वाचली, डॉना समरच्या मृत्यूची आणि मन भूतकाळात मागे गेलं, बर्‍यापैकी मागे, पार ८५-८६ सालामध्ये. तेव्हा अस्मादिक कुठेतरी पाचवी-सहावीमध्ये असतानाची गोष्ट. आमचे बंधुराज आमच्याहून पाच वर्षांनी मोठे. त्यावेळेस ते कॉलेज-कुमार बनून त्यांचा सोनेरी काळ जगत होते नि आम्ही शाळेत स्वतःचं आयुष्य फरफटवत होतो.

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 21/05/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा 'देवदास' आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती. 'पण मला तर आवडला बुवा' एक कन्या म्हणाली. 'काय आवडले तुला?' असा प्रश्न विचारताच 'कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.' कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही मिनिटे भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला.