सिलचर आसाम
या वेळी मला आसाम च्या सिलचर येथे जाण्याचा योग आला. इंफाल चे काम आटोपल्यावर इंफाल ते सिल्चर येथे मी १०० आसनी विमानाने गेलो. हे अतर तसे २६० कि.मी चे पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे खुप दगदगीचा हा मार्ग आहे. त्यामुळे विमानाने ४० मिनीटात पोचलो. विमानतळ हे सिलचर हुन ३२ कि.मी वर असल्याने मला घ्यायला मला घ्यायला उदय दास हे कार्यालयाचे व्यवस्थापक आले होते. जितका वेळ मला इंफालहुन सिलचर विमानतळावर यायला ला लागला त्यापेक्षा अधिक वेळ मला विमानतळावरुन सिलचर ला जाण्यास लागला. तेथे माझी भेट नागपुरचे राजेश देशकर यांचेशी झाली. राजेश हे सर्व प्रथम आले ते अरुणाचलातील चांगलांग या दुर्गम ठीकाणी. संघाचे काम करायला.
मिसळपाव

