Skip to main content

मिपा jargon

लेखक राजो यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आल्यापासून इथल्या साहित्य चर्चा इ. चा आस्वाद घेत आलो आहे. पण प्रतिक्रियांमध्ये अनेक shortforms वापरले जातात. काहींचा अर्थ लागतो. काहींचा आजिबात नाही. उदा. प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे बाडिस - ??? मचाक - ??? आणि इतर अनेक.. नवीन सदस्यांना माहिती होण्यासाठी वाविप्र (हे अजुन एक.. :) ) मधे अशा मिपा स्पेशल शब्दांची माहिती द्यावी का?

वळवथेंब

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/08/2012 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब वळवाचा अंकुर पुन्हा उजवेल खपलीखालच्या वळणापाशी नवा श्रावण हिरवळेल पाउलवाटांचं काय पाऊल पडेल तिथे वाट सापडेल अवखळ खळखळणारं पाणी ओंजळीत साकळेल आकाशही मावेल मग त्यात रुसलेलं गावेल निर्व्याज पावेल मावळतीच्या संध्येकाठी चंद्र चांदणं हसेल ..................अज्ञात
काव्यरस

मिसळपाव वर मोबाईलद्वारे कस लिहायच ???

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 30/08/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे सध्या Nokia e5 हा फोन आहे . यामध्ये मी opera mini किंवा opera mobile वापरुन मिसळपाव किंवा ईतर मराठी साईट चांगल्या प्रकारे वाचु शकतो .(opera:config मध्ये बदल करुन ) परंतु मराठी लिहीता येत नाही . (माझे नाव मराठित असल्यामुळे मि मिपावर log in सुध्दा होउ शकत नाही.) opera mini मधे मराठी कॉपी पण करता येत नाही . शिवाय मिपावर एकदा लॉग इन केल्यावर आणि गमन न करता बाहेर आल्यावर पुन्हा user name आणि password का टाकावा लागतो ?

मिसळपाव.

लेखक गवि यांनी गुरुवार, 30/08/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
3

फिनिक्स

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 30/08/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न घेऊन आले पंख डोळ्यात जखमेला पुन्हा निळे पान्हे आभाळ-रोगाचा एखादा रोगी कण्हतो वादळ विराम दिला स्वतःनंतर आता मालकीचे काही नाही वाटा आल्या वाटा गेल्या भेगेचा झणाणा जळात शिरला नग्नपणे लाटांवर आभाळ हालत राहिले ... खोल खोल गर्भात कुणाच्या त्याच्या परतीचे रस्ते गुंता नुसता! -पूर्वप्रकाशित

Samsung विरुद्ध Apple

लेखक गुरुनाथ्काळे यांनी बुधवार, 29/08/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.