Skip to main content

माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 03/09/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती. त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता--

मनधुंद - मनाला धुंद करणारी गाणी

लेखक योगेश पितळे यांनी रविवार, 02/09/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतलता निर्मीत आणि गीतकार अखिल जोशी प्रस्तुत मनधुंद हा एक सुंदर मराठी अल्बम नुकताच ' मानबिंदू म्युझिक 'तर्फे ऑनलाईन प्रकाशित झाला आहे. पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयावर आधारलेली;गीतकार अखिल जोशी यांनी लिहिलेली ९ वेगवेगळी गाणी या अल्बमद्वारे मिपाकर संगीत रसिकांना ऐकायला मिळतील.मर्डर-२, देव-D, दस कहानिया या सारख्या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलेल्या क्षितीज तारेने प्रथमच एका मराठी अल्बमसाठी पार्श्वगायन केल आहे.

खुसखुशीत पाकळ्या

लेखक नूतन यांनी रविवार, 02/09/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच्या चहाबरोबर तोंडात टाकायला खुसखुशीत व पौष्टिक पदार्थ (हे प्रमाण दोन माणसांसाठी आहे) साहित्यः मोड आलेले मूग २ वाट्या हिरव्या मिरच्या २-३ आलं २-३चकत्या चिरलेली कोथिंबीर १ मूठ मीठ चविनुसार पावाचा चुरा जरुरीनुसार (अंदाजे १ वाटी) उकडलेला बटाटा १ (मध्यम आकाराचा) डाळीचे पीठ (बेसन) १ मोठा चमचा पाणी जरुरीनुसार तेल तळण्यासाठी कृती

घरचं जेवण

लेखक मन१ यांनी रविवार, 02/09/2012 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पेठकरांचा इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे आधीच हरवून बसलोय; ते घालवलय ह्याची जाणीव झाली. तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं. परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं. एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो.

ट्रेनच्या प्रवासामधील मधील एक विचीत्र अनुभव

लेखक शुचि यांनी रविवार, 02/09/2012 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
जिंक्स यांचा "अतर्क्य" हा अनुभवात्मक लेख आत्ताच वाचला. खरोखर विचीत्र म्हणावा असा अनुभव आहे. माझा असाच एक अनुभव सांगू इच्छिते - मी मुंबईच्या लोकल ट्रेनने मुलुंडला चालले होते. वेळ ऑफीस सुटल्यानंतरची असल्याने अतोनात गर्दी होती. अर्थातच मी लेडीज डब्यात होते. पण यावेळेस गर्दीचा रेटा भीषण होता इतका की मला वाटले कोणाचा तरी चेंगरून, गुदमरून मृत्यू होईल या गर्दीत . मुलुंड जवळ येऊ लगले तशी मी दाराकडे सरकून जवळजवळ दारातच उभी राहीले की उतरता यावे. एका हाताने पर्स धरलेली तर दुसरा हात बारवर अगदी रोवलेला. बाहेरची हवा खात जीव मुठीत धरुन उभी होते आणि कोणीतरी डोक्यावरुन हात फिरवायला सुरुवात केली.

वांगी भात

लेखक गणपा यांनी रविवार, 02/09/2012 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडली काय चाल्लावं? रैवारचं नल्ली बल्ली फोडलावं कं नाय? आज जल्ला आमच्या हतं मार्केट बंद. आन माजा फिरीज पन रोडावलता. त्यात हतं मिपावं एकाव-एक धागेकाडुन, मिपाशी कुक मंडली माजं डोस्कं फिरवुन रायली. जल्ला त्यातला एक पदार्थ घरान अशेल तर शप्पत. फिरीजमन डोकावलं ता एक वांगं तेवरंच भेटलं. आता ह्याचा काय कराचां म्हनुन थोडा डोस्कं खाजवलन. थोडं सामानाची जुलवा जुलवं केली नं ह्यो बग मीनी काय केला तं. आवरलं असेन तर मंग कसं काय केला त सांगतव.

सुरनळ्या

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 02/09/2012 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-एक वाटी जाडे तांदूळ(शक्यतो जुने असावे) एक वाटी आंबट ताक मूठभर पोहे एक वाटी खवलेला नारळ पाव चमचा हळद अर्धा चमचा मेथी दाणे. गूळ चवीप्रमाणे मीठ तूप. कृती :- तांदूळ धुऊन घ्यावे.मेथी व ताक घालून ४-५ तास भिजत घालावे.बारीक वाटून घ्यावे.

आर्त

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 02/09/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी गोत हळवे व्यापलेले व्याध सावज उभय मी गुंतले पाशात दोघे पोत अवघे रेशमी दाखवे उसवे न कोणी गाठ त्यांची संयमी वाटकाठांची फुले ही बहर त्यांचा मोसमी ..........................अज्ञात
काव्यरस

हनी - चिली पोटॅटोज

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 02/09/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य: २ ते ३ बटाटे सालं काढून, उभे -लांब चिरुन घेणे (फ्रेंच फ्राईजप्रमाणे) १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण १-१/२ टेस्पून टोमॅटो सॉस १ टीस्पून चिली फ्लेक्स (नसल्यास लाल तिखट वापरु शकता आवडीप्रमाणे कमी-जास्त) थोडेसे मीठ १ टीस्पून तेल .

दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

लेखक पैसा यांनी रविवार, 02/09/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे. मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे. दै.