साहित्य:
२ ते ३ बटाटे सालं काढून, उभे -लांब चिरुन घेणे
(फ्रेंच फ्राईजप्रमाणे)
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१-१/२ टेस्पून टोमॅटो सॉस
१ टीस्पून चिली फ्लेक्स
(नसल्यास लाल तिखट वापरु शकता आवडीप्रमाणे कमी-जास्त)
थोडेसे मीठ
१ टीस्पून तेल
पाकृ:
एका रिक्लोझेबल बॅगमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करुन हलवून मिक्स करुन घेणे.
(भांड्यात ही एकत्र करुन घेऊ शकता)
ओव्हन २०० डिग्री सें वर प्री-हीट करुन घेणे.
बेकिंग ट्रेवर व्हॅक्स पेपर लावून किंवा तेलाने ग्रीज करुन घेणे.
त्यावर बटाट्याचे उभे काप सर्वत्र पसरवून घेणे.
२०० डिग्री सें वर ३०- ३५ मिनिटे बेक करणे
(मधे एकदा बटाटे उलटवून ठेवणे)
नोटः ज्यांच्याकडे ओव्हन नाही ते डीप फ्राय करु शकतात, फक्त त्यात मग बटाट्यांना तेल लावू नये.
साहित्य सॉसः
१ टेस्पून डार्क सोया सॉस
१ टेस्पून टोमॅटो सॉस
१-१/२ टेस्पून मध
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
१-१/२ टीस्पून तीळ
कांद्याची पात बारीक चिरून
मीठ चवीनुसार
(सॉसमध्ये ही मीठ असतं, तसेच बटाट्यांमध्ये ही घातलं होतं)
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये तेल गरम करुन लसूण परतून घ्या.
लसूण चांगला परतला गेला की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, मध, मिरपूड व मीठ घाला.
त्यात बेक केलेले बटाटे घालून सगळं मिक्स करा.
आता त्यात कांद्याची पात व तीळ घालून एकत्र करा.

गरमा-गरम हनी - चिली पोटॅटो स्टार्टर / अॅपेटायझर म्हणून सर्व्ह करु शकता किंवा कुठल्याही न्युड्ल्स, फ्राईड राईसबरोबर सर्व्ह करु शकता.
प्रतिक्रिया
कसला टेंप्टिंग प्रकार दिसतो आहे!!
फॉर्म्युला
In reply to कसला टेंप्टिंग प्रकार दिसतो आहे!! by बहुगुणी
जबरदस्त
_/\_
काय गं प्रतिक्रिया देऊ
चखना.
गेली १५ मिनीटे टक लावून
आईग्ग! अगदी हेच म्हणायचय.
In reply to गेली १५ मिनीटे टक लावून by गणपा
व्वाव!
In reply to गेली १५ मिनीटे टक लावून by गणपा
हं.......
(No subject)
छान ..
छ्य्याआआआ......... छळ च छळ!
लय भारी .
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!!
काय छळ चालवलाय राव आज! मिपाचे
शेवटचा फोटो जीवघेणा आहे.
फार लाळ गाळण्यापूर्वीच
जबरी
प्रॉमीस पाळल्याबद्दल
नेहमी प्रमाणेच अप्रतिम..:)
खुप मस्त
अ प्र ति म
छानच.
पा़कृंचे इतके चांगले फोटो
हुकुम.
In reply to पा़कृंचे इतके चांगले फोटो by मराठे
का असा अंत पाहता?
सही
आजकाल जुन्या पाक्रु दीसत का
धन्यवाद