Skip to main content

ते -२

लेखक स्पा यांनी सोमवार, 24/09/2012 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/content/%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A7 पीसी उघडला. DVD तले फोटो ओपन केले .. सुरुवातीला . समुद्राचे.. टेकड्यांचे, शेतांचे, फोटो होते. सुंदरच साईट आहे .. सातव्या फोटोत ती गढी दिसली आणि मी हादरलोच .. पुढचे सगळे फोटो मी अधाश्यासारखे पहिले .. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .. हो तीच ती गढी..जळलेली. भेसूर. विद्रूप.. गेल्या २५ वर्षांपासून जे अगम्य कोडं स्वतःशी बाळगून होतो ..

उकडीचे मोदक

लेखक Pearl यांनी सोमवार, 24/09/2012 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
उकडीचे मोदक... माझे एकदम फेवरेट आहेत. पण जनरली उकडीचे मोदक, पुरणाच्या पोळ्या & so on... यासारख्या पाककृती म्हणजे नवशिक्यांसाठी 'डी' ग्रुपचे Questions असतात. त्यामुळे मी कधीच या पदार्थांच्या मागे लागले नाही. पण या गणेश चतुर्थीला आयते मोदक मिळण्याचे दूरदूरपर्यंत काही चान्सेस नसल्याने 'मोदक पहावे करून' असा विचार मनात येऊ लागला. मग म्हंटलं, ट्राय तर करून पाहू. जमलं तर जमलं, नाही तर नाही. पहिल्यांदाच मोदक केले आणि छान झाले. त्याचीच कृती इथे देत आहे.

सैतानाचे वरदान

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 24/09/2012 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध, थयथयाट आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ? आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल - कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे.

पाणावलेल्या डोळ्यांना

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 24/09/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही ! कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !! रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले ! मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !! मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली ! तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!

दाल खिचडा / खिचडी.

लेखक गणपा यांनी रविवार, 23/09/2012 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
 मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची?