Skip to main content

केरळ सहल

लेखक बंडा मामा यांनी बुधवार, 17/10/2012 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! बर्‍याच वर्षांनी आम्ही (मामा आणि मामी) देशांतर्गतच एक सहल करण्याचे ठरवतो आहोत. सध्या केरळ हा भाग निश्चित केला आहे. पूर्वी कधी पाहिलेला नसल्याने आणि सुंदर चित्रे पाहुन हा निर्णय घेतला आहे. मिपाकरांपैकी कुणी केरळ सहल केली असल्यास खालील बाबतीत मार्गदर्शन करावे म्हणून हा धागा टाकत आहे. ह्या माहितीचा फायदा इतरही केरळ जाण्यास उत्सुक लोकांना व्हवा हा उद्देश आहे. १. केरळ्ची सहल घडवणार्‍या चांगल्या ट्रॅवल कंपन्य कोणात्या? तुम्ही ट्रॅवल कंपनीमार्फत गेले असलास तुमचे अनुभव कसे अहेत? २. ट्रॅवलकंपनी शिवाय जाणार्‍यांचे अनुभव काय? ३. आमचे बजेट ५०,०००/- रुपये आहे.

राबर्ट्,खुर्शीद,नितिनभाऊ गडकरीजी

लेखक चिरोटा यांनी बुधवार, 17/10/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
'त्यागी' गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट नंतर खुर्शीद आणि आता नितिनभाउ गडकरींचा नंबर लागला आहे.पुढचा बॉम्ब गडकरींवर टाकणार आहोत हे Indian Against Corruption ने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे थोड्यावेळापूर्वी केजरीवाल ह्यांनी बॉम्ब टाकला आहे.

कताई शास्त्र ७

लेखक बापू मामा यांनी बुधवार, 17/10/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
कताई शास्त्रात गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुताचे नंबरिंग अजूनही भारतात FPS system मध्येच जास्त प्रचलित आहे. त्याला ईंग्लिश नंबरिंग सिस्टीम असे म्हणतात व त्याचे युनिट काउंट अथवा ईंग्लिश नंबर हे आहे ( Ne) . जर ८४० यार्ड सुताचे वजन १ पौंड (४५४.५ ग्राम) भरले तर त्या सुतास १ काउंटचे ( 1 Ne or 1s) सुत म्हणतात. (सुता आधीच्या प्रक्रियेतील मालास हँक (Hank) असे म्हणतात, व्याख्या तिच ) याच प्रमाणे २० काउंट चे सुत म्हणजे २० x ८४० एवढ्या लांबीचे, वजनात १ पौंड भरणारे सुत, अथवा ३४ काउंट चे सुत म्हणजे ३४ x ८४० एवढ्या लांबीचे वजनात १ पौंड भरणारे सुत.

शिखर स्वामिनी कळसुबाई

लेखक saumitrasalunke यांनी मंगळवार, 16/10/2012 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
२४ जून २०१२ शिखर स्वामिनी कळसुबाई पहाटे सव्वा पाच वाजता घोटी बस स्थानकातून सुटणाऱ्या एस. टी. बसने पावणे सहा वाजता बारी गावात आम्ही पोहोचलो तेव्हा कळसुबाईचा ऐसपैस डोंगर नुकताच जागा झाला होता मात्र अंगावरची धुक्याची दुलई तशीच होती. पहाटच्या अश्या गारव्यात दुलई दूर सारेल तरी कोण? या अश्यावेळी त्याच्या सर्वोच्च माथ्याचे दर्शन होणे केवळ अशक्य. बारी बस थांब्याला लागून असलेल्या लहानश्या दुकानात चहा आणि पोहे घेऊन, थोडासा ‘वॉर्म अप’ करून आणि पाठपिशव्या व्यवस्थित लावून, बरोबर सात वाजता आम्ही पायवाटेला लागलो.

कलावंतीण सुळका

लेखक saumitrasalunke यांनी मंगळवार, 16/10/2012 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळका दिनांक: १३ ऑक्टोबर २०१२ भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक. पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो... ....कुर्ल्याहून ५.०७ ची पनवेल लोकल पकडली आणि ६ च्या सुमारास पनवेलला पोहचलो. ठाकूरवाडी ला जाणारी बस ६.५५ ला होती. मात्र आम्ही ६.२० ची मोपाडा (मोहोपाडा असावी) ला जाणारी बस पकडून, २० मिनिटांत शेडूंग फाट्याला उतरलो. (रू.८/-एकाचे). तिथून एका ऑटोवाल्याने आम्हाला पुढच्या दहा मिनिटांत ठाकूरवाडीला पोहोचवले. (रू. ८०/-दोघांचे). या इथून बरोबर ७.०५ ला आम्ही प्रबळमाची, या कलावंतीण-प्रबळगडाच्या पायथ्याच्या गावाला वाट जाते. हि वाट चांगलीच मळलेली आहे.

असेही पालकत्व

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/10/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल माहेरी गेले. जाताच माझ्या भाच्या मी भेटल्या पर्यंतच्या ताज्या बातम्या मला लगेच देतात. तशाच त्या मी गेल्याबरोबर धावत आल्या आणि म्हणाल्य आत्या आत्या भुषणच्या मांजरीला ३-४ कुत्र्यांनी मारून टाकल. आता तिची तिन बाळं बाटलीने दुध पितात. पहिला त्या मांजरीबद्दल आणि अनाथ झालेल्या पिल्लांबद्दल वाईट वाटले. मग ही पिल्ले बाटलीने दूध कशी पितात त्या बद्दल उत्सुकता लागली. कॅमेरा नेहमीप्रमाणे होताच बरोबर. भाच्यांना सांगितले भुषणला सांगा मी फोटो काढायला येतेच दूध पाजायचे असल्यावर मला हाक मार. भुषण म्हणजे माझ्या आईच्या शेजारी असलेल्या कुटूंबातील ८ वीतील मुलगा. आमच मानलेल नात आहे.

कृत्य कुणाचे, “खाप”र कुणावर?

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 16/10/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
कृत्य कुणाचे, “खाप”र कुणावर? भारताच्या सारख्या प्रजासत्ताक राष्ट्रात अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं? नातेसंबंधांमध्ये ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाची रूपे आहेत तितकेच किंबहुना भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचे पैलू स्त्री रुपाला आहेत.

कॅमेरा आणि बेसिक फोन या बद्दल

लेखक गणेशा यांनी सोमवार, 15/10/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
१. या दिवाळीला १ डीजीटील कॅमेरा घेण्याचे मनात आहे.. परंतु जास्त काही त्यातील कळत नसल्याने येथे चर्चासत्र ओपन करत आहे. तसे गुरुघंटाल यांचा मागील धागा ओपन केला, परंतु slr कॅमेरा बद्दल तो धागा होता, आणि त्यात मिपाच्या नविन रुपड्या मुळे की काय प्रतिसादा मध्ये काहीच दिसत नव्हते.. तसे पाहिले तर, आधी SLR कॅमेराच घेण्याचा ठरले होते 550 D. परंतु, कॅमेरातील आणि त्यातही मॅन्युल मोड चे काहीच जास्त माहिती नाही.. पुन्हा असे ऐकुन आहे की.. १५-२०००० ची लेन्स घ्यावे लागतात त्या कॅमेराला पुन्हा..

मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 15/10/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग) ‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार. ‘या. बसा तिथं.’ उमेदवार बसतो. ‘नाव ?’ ‘सुमित अरुण नार्वेकर ‘ ‘शिक्षण ?’ ‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’ ‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी. ‘अं..C किंवा जावा..’ ‘ते languagesआहेत.

आठवण

लेखक मयुरपिंपळे यांनी सोमवार, 15/10/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास | ती येते काही क्षणासाठी पण हे मग स्वप्न तरी कशासाठी | मन हे खूळ तुझ्या स्वप्नात साजणे कधी येशील माझ्या मनात | -- मयुर