मनास वाटे -
. .
मनास वाटे
उगाच वाटे
उदास वाटे
भकास वाटे
मनात वारे
उगाच सारे
भलते सारे
गोळा सारे
मनात काय
उगाच काय
भलते काय
वाटते काय
मनास नाही
उमगत काही
भलते प्रवाही
वहातच राही !
.
काव्यरस
पाठशिवण!
सांजेला तसा वेळ होता.
अजुन शिवारात लगबग जाणवत होती.
आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला,
माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती.
तस तिच माझ नात फार वर्षांच.
आजोळी आईचा पदर धरुन
येउ लागल्यापासुनच
माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती
अन,
शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या
गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी
हिची ओढ होती.
नेहमीसारख मी मोटवनीवरुन
विहिरीत डोकावुन पाहिल.
काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत.
क्षणभर भारल्यासारख झाल.....
आजुबाजुचे आवाज विरले.....
"थंड आहे पाणी ते!", मी दचकलो.
मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी
एक निटस नवयौवना उभी!
नाही म्हंटल तरी जरा मोहरलो...
"खाली
रख्स-ए-बिस्मिल (DANCE OF A WOUNDED)
या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.
इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.
इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...
इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...
या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख ज
काव्यरस
मलई कोफ्ता
साहित्यः
पनीर - १/२ वाटी
खवा - १/२ वाटी
मिक्स ड्रायफ्रुट्स (काजु, बदाम, पिस्ता, मणुका) - २ चमचे
काळि मिरी पावडर - २ चमचे
कॉर्नफ्लॉवर - १ चमचा
२ कांदे
काळि मिरी - २-३
लवंगा - १-२
दालचिनी - १ इंच तुकडा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
काजु - १/२ वाटी (१ तास भिजवुन त्याची पेस्ट करुन घ्यावी)
क्रिम - २ चमचे
हिरवी मिरची - १
गरम मसाला पावडर - १ चमचा
तुप - १/२ चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
कृती:
१. एका पॅन मधे १/२ चमचा तुप गरम करावे. त्यात १ चमचा मिक्स ड्रायफ्रुट्स, १/२ चमचा काळि मिरी पवडर व एकदम थोडे मिठ टाकुन १ मिनिट परतावे. ते परतल्यावर बाजुला काढुन ठेवावे.
अजुन काही फोटो
या फोटो मधे काहीही after processing केलेले नाही :)

सह्याद्रि भटकंती !!!
सह्याद्रि हाच मुळी अचाट विषय आहे. लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे.
बटाटा-सफरचंद खिर
साहित्यः
अर्धा वाटी तांदूळ
अर्धे सफरचंद
१ छोटा बटाटा
१ मोठी वाटी दुध
पाउण वाटी साखर
थोडे केसर
काजु, बदाम
२ चमचे साजूक तुप
१ छोटा पेला पाणी
कृती:
१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.
२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.
३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.
४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन ल
असेच काही उदासवाणे .....
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच.
ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही.
मिसळपाव

