Skip to main content

आपण इंटरनेट हिंदू आहात का?

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 23/12/2012 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
रामचंद्र गुहा हे विख्यात विचारवंत आणि इतिहासकार म्हणून बहुतेकाना माहीत आहेत. त्यांच एक इंट्रेस्टिंग आर्टिकल काही दिवसापूर्वी वाचनात आल. ढोबळ मानाने विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. इंटरनेट. गुहानी या आर्टिकल मधून त्या विषयाला तोंड फोडल आहे जो आपल्या सगळ्यांना जाणवत तर होता पण त्याला शब्द रूप देता येत नवत. गुहानी या आर्टिकल मध्ये इंटरनेट हिंदू ही संकल्पना मांडली आहे. गुहांच्या शब्दात ," However, it is always articles that touch on the philosophy and practice of Hindutva that attract the most attention (and anger).

मेथी मलई मुर्ग

लेखक अनुप कुलकर्णी यांनी रविवार, 23/12/2012 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! गेली अमुक अमुक वर्षं मी मिपा वाचतो आहे. अमुक अमुक अशासाठी म्हणलं कारण मी सदस्य तरी नुकताच झालो आहे पण पाहुणा म्हणून वाचनमात्र गेली अनेक वर्षं होतो. तर सांगायचं असं आहे की मिपा वरचं इतर साहित्य तर वाचनीय आहेच पण मी सगळ्यात जास्त इंटरेस्टनी वाचतो ते 'खाद्य' साहित्य !! मिपा वरच्या कित्येक पाककृती रेफर करून आता पदार्थ करणं आणि त्यांच्यावर प्रयोग करणं हा माझा आवडीचा छंद झाला आहे. त्यामुळं माझ्यासाठी मिपा वरचं पहिलं लेखन काय करावं असा प्रश्नच पडला नाही.

ड्रॅगनच्या देशात ०९ - जुने लिजीआंग (पृथ्वीवरचे नंदनवन) : शुहे व बैशा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 23/12/2012 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

बादशाही ऑम्लेट

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बादशाही ऑम्लेट : साहित्य अंडी - २ कांदे - १ मध्यम आकाराचा आलंलसूण पेस्ट - १ चमचा मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या सोया सॉस - १ चमचा चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा तेल - गरजेनुसार जिरं - चिमूटभर मोहरी - चिमुटभर मीठ - चवीपुरते कॄती : प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये ) मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा जिरं मोहरी फुलून आल्या बर

झिंगा खिचडी

लेखक jaypal यांनी शनिवार, 22/12/2012 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य १०/१२ मोठे झिंगे(कोळंबी) १/२ चमचा हळद १ लिंबु १ वाटी घट्ट फेटलेल दही. ३ ते ४ चमचे मिठ ३/४ चमचे आल लसुन पेस्ट १०/१५ काजु ३ लाल टोमॅटो ४/५ कांदे पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या ४/५ १०० मि.ली. तेल ४ चमचे साजुक तुप लाल ति़खट आवडीप्रमाणे सुमारे ३०/४० मिनीटे भिजवलेला ३ वाट्या तांदुळ (बासमती असल्यास उत्तम) खडा मसाला ७/८ काळी मिरी, १ मोठी वेलची, तमालपत्र, ५/६ लवंगा. गरम पाणि अंदाजे ६/७ वाट्या. झिंगे/कोलंबी धागे काढुन स्वच्छ धूउन घ्या.

निवृत्त

लेखक शैलेंद्रसिंह यांनी शनिवार, 22/12/2012 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात] पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे. [सगळे अवाक, हे काय भलतंच] पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना? [पत्रकारांची होकारात्मक शांतता] पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे.

प्रयोग..

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुर्वी लिहीलेली एक कथा सापडली, ती जशीच्या तशी इथे टाकत आहे ( सुचत असून बदल करत नाही ) ;) फॉर अ चेंज यावर काकु करूया :) ********* शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरू केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच. आयुष्यात चॅलेंजींग असं काहीतरी घडावं असं प्रत्येकालाच मनाच्या कोप-यात कुठेतरी वाटत असतं, मी ही त्याला अपवाद नव्हतो. पण रोजची ती रटाळ बडबड त्याच ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे.......... वैताग होता सगळा.

गाजर-मिरचीचे चटकदार लोणचे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 21/12/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २-३ गाजर सालं काढून, उभे तुकडे केलेले ३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात (मिरच्यांचे प्रमाण,गाजर किती घ्याल त्याप्रमाणे वाढवावे किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) २ टेस्पून लिंबाचा रस १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १-१/४ टीस्पून मेथीदाणे वाटून पूड केलेली १-१/४ टीस्पून मोहरीची डाळ मीठ चवीप्रमाणे तेल