वि 'लीन' करण
एप्रिल मध्ये काकांची,
संपतीय मुदत,
मग बदलावीच,
लागणार आदत ||
राज्यसभेत नाही प्रवेश,
म्हणून हा नाट्यप्रवेश ||
नुसती भावनिक
पाजा वाईन,
पाळीव पत्रकार
देती हेडलाइन ||
अपुरी संख्याबळे
मग बोला बळेबळे ||
देऊन आवळा
(१० आमदार)
पाहिजे कोहळा
(४१ आमदार) ||
प्रत्येक चाली ला,
काटशह देऊन,
नानांनी केलंय
दीन-लीनकरण ||
लोक राहिले नाहीत
पूर्वीसारखे अडाणी,
आता काय उपयोग
भेटायला येऊन अदानी ||
रीटायर चा ढोंगीपणा,
वर्षापूर्वी नसता केला,
६० वर्षाचा सन्मान
असहाय्य नसता गेला ||
ब्रेक के बाद..
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!
या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.
माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.
धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”
तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”
ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.
अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”
पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता.
घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही.
दाटलेली हुरहूर.
दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
https://youtu.be/RBXDiuu3qT8
काव्यरस
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
-राजीव उपाध्ये
२०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.
आंब्याच्या झाडवरचे सरडे
सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.
"बौद्ध मूर्तीशास्त्र"
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:))
तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...
ए. आय. वापरून केलेले मराठी लेखन कसे ओळखावे?
इंग्रजी आणि युरोपियन भाषांमधे लेखन करण्यात ए. आय. पटाईत आहे. (विवेकी आहे का ते अजून माहित नाही पण पटाईत मात्र आहे, अजिबात विवेक नसलेले पटाईत लेखक माणसांत देखील असतात त्यामुळे ए. आय. तर आपल्याच डेटावरचा पोपट आहे), मात्र भारतीय भाषांमधे लेखन करताना खूपदा ए. आय. बेसिक चुका करतो. आताशा त्या चुका बर्याच कमी झाल्या असल्या आणि उत्तरोत्तर या चुका कमीच होत जाऊन अनकॅनी असे लेखन तो करेल.
मिसळपाव