Skip to main content

दुधी-मोतिया खीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 10/03/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी साल व बीया काढून किसलेला दुधी १ लिटर दुध २-३ टेस्पून भिजवलेला साबुदाणा ३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टीस्पून बदामाचे काप १ टीस्पून पिस्त्याचे काप १/४ टीस्पून केशर १/२ टीस्पून वेलचीपूड १ टेस्पून साजुक तूप .

रताळ्याची खिर.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 10/03/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)रताळ्याच्या कापलेल्या फोडी.(चकत्या) २)चवीप्रमाणे गूळ. ३)चिमूटभर मीठ. ४)दोन मोठे चमचे भिजवलेला सबूदाणा. ५)नारळाचे दूध्.(जाड व पातळ) ६)वेलचीपूड. ७)साजूक तूप. कृती :-रताळ्याच्या फोडी पाणी घालून शिजत ठेवाव्या.थोड्या शिजल्या की त्यात भिजवलेला साबूदाणा घालावा. गूळ व मीठ घालून फोडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.फोडी शिजत आल्या की त्यात पातळ नारळाचे दूध घालावे व उकळी येऊ द्यावी.मग त्यात नारळाचे जाड दूध घालावे.उकळले कि त्यात वेलचीपूड व साजूक तूप घालून गॅस बंद करावा.थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करा.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/03/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

रताळ्याचा शिरा

लेखक कच्ची कैरी यांनी रविवार, 10/03/2013 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
shiraकृती- १)रताळे सोलून व किसून घ्यावे . २) एका कढाईत तूप गरम करावे ,त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे . रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी .उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व निट एकजीव करून घ्यावे . ३) रताळी चांगली शिजू द्यावी ( साधारण १० ते १५ मिनिट लागतील ) .

प्रेम - भक्ती

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 10/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत. संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं.

अद्भुत भाग ३

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 10/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
8 तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा.

राहुलजींच्या कारकीर्दीतील पुढचा टप्पा

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 10/03/2013 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.theunrealtimes.com/2013/03/08/impressed-by-rahuls-lack-of-in… राहुलजींनी लग्नाचा विचार नाही व भारताचा अनभिषिक्त सम्राट व्हायची इच्छा नाही. तमाम पायघड्या घालणारे काँग्रेसी चेले बुचकळ्यात पडले. पण ह्या थोर वर्तमानपत्राने आपला मोठ्ठा शोध लावला आहे की महाज्ञानी राहुलजी पोपच्या पदाकरता उत्सुक आहेत. आता सगळा उलगडा झाला.

हाळिवाचे लाडु

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 09/03/2013 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः हाळिव - १ वाटी नारळ - १ गुळ - दिड वाटी नारळाचे पाणी - १ वाटी विलायची पावडर - १/२ छोटा चमचा कृती: १. हाळिव निट निवडुन घ्यावेत. त्या मधे अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. लाडु खाताना ते दाताखाली आल्यास कचकच लागते. त्यामुळे हे काम वेळखाउ असले तरी निट करावे. २. ओला नारळ फोडुन, त्याचे पाणी वाटीत काढावे व खोबरे खवुन घ्यावे. ३. एका भांड्यामधे हाळिव, नारळाचे पाणी व खवलेले खोबरे टाकुन मिक्स करावे. नारळात जास्त पाणी नसल्यास, शहाळ्याचे पाणी वापरले तरी चालेल. ४. आता हे सर्व निट मिक्स करुन, २-३ तासांसाठी झाकुन ठेवावे.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

लेखक लिलि काळे यांनी शनिवार, 09/03/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.