Skip to main content

मी परत आलेय !!!

लेखक चुचु यांनी शनिवार, 13/04/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी चुचु, काही महिने मिपापासुन दुर होते. आता परत आलेय. जुन्या सभासदांना साश्टांग नमस्कार. नव्यांना सप्रेम नमस्कार. करुया कल्ला.. कल्ला कल्ला ;) आप्ली नम्र, चुचु

छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना

लेखक एस यांनी शुक्रवार, 12/04/2013 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे लेख - कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
डीएस्एल्आर कॅमेरा म्हणजे नक्की काय?
          डीएस्एल्आर कॅमेरा म्हणजे ज्याच्या लेन्सेस बदलता येतात असा कॅमेरा हे सर्वसाधारणपणे लोकांना माहिती असते.

तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एकतपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -दोन

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 12/04/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एकतपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एक पुढे.... मेनका अवघ्या सोळा वर्षांची अक्षत यौवना होती, आज पहिल्यांदाच इंद्रासमोर नृत्य करीत होती. नृत्य करता-करता इंद्राची तिच्या सर्वांगावर भिर-भिरणारी नजर तिच्या ध्यानात आली. याचा अर्थ ही तिला माहीत होता. अप्सरा म्हणजे स्वर्गातल्या भोगदासी, आणि अप्सरेवर पहिला हक्क सदैव इंद्राचाच. पुढे काय होणार या कल्पनेने तिचे शरीर थरथर कापत होते.

अलि अँड द बॉल: कुंपणाआडचं आभाळ

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 12/04/2013 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे. कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्‍या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक

लेखक लाल टोपी यांनी शुक्रवार, 12/04/2013 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
१४ एप्रिल १९४४ या तारखेचे महत्व मुंबईच्या इतिहासात अनन्य साधारण आहे यात शंकाच नाही. जे महत्व पुण्याच्या इतिहासात १२ जुलै, १९६२ ला आहे ज्या दिवशी पानशेत धरण फुटल्याने जुन्या पुण्याचा चेहरा बदलला पण त्यावेळी शहरात असणा-या लोकांच्या मनात खोलवर आघात करून गेला असाच दिवस मुंबई ने अनुभवला १४ एप्रिल, १९४४ ला. हा दिवस अग्निशमन सुरक्षा दिन म्हणूनही पाळला जातो. काय होती ही दुर्घटना? पाहुया.. कॅप्टन ब्रेन्ली ओब्रेस्ट हा ब्रिटिश आर्मीचा आणि भारतीय सैन्याच्या दारुगोळा विभागाशी संलग्न असणारा अधिकारी दुपारच्या जेवणासाठी नुकताच आपल्या कुलाब्यातील घरी पोहोचला होता.

मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 12/04/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे 'बे रूज' पार्श्वभूमी: बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल 'ब्लॅक करंट' ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते.

माय ईंग्लिश वॉल्कींग..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 12/04/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात.. पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते.. माझे आईवडील अश्यांपैकीच एक.. काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला...

वृक्षारव

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 12/04/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका पवनाचे हुंकार झेलतो जरी कधी असतो तो धोका .........................अज्ञात
काव्यरस

आजी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 12/04/2013 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
"लिव्ह योर बेस्ट लाइफ" या "ओ - द ऑपराह मॅगझिन" च्या अंकामधील एका लेखाचे भाषांतर. हा लेख त्यातील लहान लहान वाक्यशैली व मसुद्यामुळे मला खूप आवडला. _______________________________________ बालपणी, उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू. कॅलिफोर्नियामधील "पॅरडाइज" नावाच्या गावात माझी आजी रहात असे.गाव नावाप्रमाणेच देखणे, वनश्रीने नटलेले खेडे होते.आमच्या सुटीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकविले नाही?शिवणकाम म्हणा, विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनविणे म्हणा सर्व काही शिकविले.

ब्राउजर एक्स्टेंशन्स

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 11/04/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,सुझेच्या अ‍ॅन्ड्रॉइड धाग्यात अ‍ॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे. तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे. *************************************************** ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते. आता सर्वात प्रथम मी जे एक्स्टेंशन्स इथे देणार आहे ते प्रायव्हसी इनहान्स करणारे आहेत.प्रायव्हसी बाबतीत बरेचसे इंटरनेट युजर्स जागरुक न