Skip to main content

शिवस्वरोदय शास्त्र, मुद्राशास्त्र आणि कर्मविपाक सिद्धांत,पुनर्जन्म वगैरे वगैरे

लेखक lakhu risbud यांनी शुक्रवार, 03/05/2013 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर सध्या 'कर्मविपाक' आणि 'पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न' या धाग्यांवर चर्चा चालू आहे.त्याच अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न १. शिवस्वरोदय शास्त्र शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे (आकाश,वायू,अग्नी,जल,पृथ्वी) या पाच तत्वांचा प्रवाह श्वासामार्गे होतो,श्वास म्हणजे प्राण,जर प्राणाकडे लक्ष देऊन मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनाचे कर्म जर मला समर्पित केले तर त्याचे कर्म निर्विकार होण्यास माझी मदत होते.

नाचते नार तोऱ्यात -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/05/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
. नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची .
काव्यरस

सांग सांग भोलानाथ.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/05/2013 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सांग भोलानाथ सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत.. तसे आम्ही पयल्यापासनंच आळशी.. निसर्गत:च शाळा-अभ्यासाचा जो कंटाळा येतो तसा तो मलाही यायचा.. नुसती मजा करावी.. आईकडून फक्त छान छान लाड करून घ्यावेत, यथेच्छ खेळा-बागडावं, खाऊ खावा असंच आम्हालाही वाटायचं. म्हणजे एका अर्थी एका नॉर्मल मुलाची जी लक्षणं असतात तीच सगळी माझ्यात होती. मग ही शाळेची भानगड कशाला पायजेल?!..

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०२ : ऑकलंड - वाईतोमोच्या काजव्यांच्या गुहा - रोतोरुआ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 02/05/2013 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

आस

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 02/05/2013 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मन नाही नाही म्हणते पण हृदयात आस घन कळवळते दरवळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते गोकुळ स्वप्नांची सलगी जिरवून कथानक वावरते तापल्या काहिली तृप्त माळभर धुंधुर माया हिरवळते ओठात शब्द स्वर कंठातिल भावना लास्यमय ओघवते आशेस किनारा वाळूचा दर्पणी कामना विरघळते ....................अज्ञात
काव्यरस

मेरा कुछ सामान …

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 02/05/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्पना : इज्ज़ाज़त सिनेमा मधील " मेरा कुछ सामान " या गीतावरून आली आहे. आज राज घरी एकटाच होता. रजनीशी फारकत घेऊन चार दिवसच झाले होते. आयशा हि सध्या त्याच्याच घरी राहण्यास आली होती. आयशा सह कर्मचारी राजची. पण काही दिवसातच दोघाचे सुत जमले आणि तेरा वर्षाचा राज आणि रजनीचा संसार पत्या सारखा विखुरला. आयशाने घरी येताच रजनीचे जे काही सामान होते ते तिच्या घरी पाठवायला सांगितले राजला. वरतून अशी ताकीद हि कि जेव्हा मी ४ दिवसात पुण्यावरून परत येईन तेव्हा रजनीचा साधा रुमाल हि मला घरात नको आहे. झाले हि तसेच. आयशा ने जसे सांगितले तसे राज ने रजनीचे सर्व सामान पाठवून दिले. आज तो घरी एकटाच होता.

आज हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 02/05/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन. प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख हो‌ऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते. युगांतर मध्ये त्याने भाग घेतलेली पहिली मोठी कामगिरी म्हणजे बॅम्फिल्ड फुलर या जुलुमी अधिकाऱ्याच्या वधाचा कट.

ओ सजना बरखा बहार आणि एक कुंद दुपार..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/05/2013 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं नांव..? ते जाऊ दे...!. ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष.. आमची वयं असतील विशीच्या घरातली.. वय वर्ष १९-२०..! सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..? शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा.. अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है..

वॉटरमेलन पिनाकोलाडा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 02/05/2013 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
Colada साहित्यः १. कलिंगडाच्या फोडि - २ कप २. अननसाच्या फोडि - १/२ कप (फ्रेश किंवा टिन मधल्या) ३. नारळाचं घट्ट दुध - १/२ कप किंवा क्रिम कोकोनट - पाव कप ४. बर्फाचे तुकडे ५. साखर किंवा मध - कलिंगड/अननसाच्या गोडानुसार कमी/जास्त ६. सजावटिसाठि पुदिना पान किंवा कलिंगड/अननसाची फोड कॄती: १. सर्विंग ग्लास (रिकामे :D) फ्रिजर मधे गार करण्यास ठेवा. असं केल्याने कोलाडा थंड राहण्याचा काळ वाढतो. २.

वासाना

लेखक अर्ध सत्य यांनी गुरुवार, 02/05/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
शु़क शुक असा 'त्या' वाटेवर काढतात आवाज काहीच वाटत नाही का? त्याना लाज? लाज शरम विकली गेली देहबोली ठरत गेली कुमरीची वेश्या झाली कोवल्या अल्पव्यीन मुलीच शोषण करत गेली। भर दिवसा भर रस्त्यावर एक आवाज येतो पाठींमागुन 'शुक शुक चलना है क्या" पण का म्हणुन? कारण फक्त एकच असत? बेंबीच्या वरची टिचभर जागा भरन्यासाठी बेंबीच्या खालची चार बोटं जागा विकावी लागते त्याना मग बलात्कार होतात ते तुमच्या आमच्यावर नाही! तर ते होतात आपल्या संस्क्रुतीवर - शिवाजि जायभाये jaybhayeshivaji@gmail.com