Skip to main content

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/06/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
१० जुन २०१३ ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती. ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..!

यांना कसलेही कौतुक

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 24/06/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे. एखादा पुणेकर तुम्हाला विचारेल ' का हो कधी टिळक स्मारकला गेलायत का' यावर समोरचा विचार करू लागतो 'हो गेलोय अमुक तमुक नाटके पाहिली आहेत'.

फुकटची समाजसेवा -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुम्बैच्या अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप करीत असतानाची (१९८८) गोष्ट आहे. एके दिवशी रात्री साधारण साडे आठ वाजता एका नौदलाच्या अधिकारी(लेफ्टनंट कमांडर यादव) एका पोस्टाच्या कर्मचार्याला घेऊन आला. त्या अधिकार्याने स्कूटर चालवत असताना या कर्मचार्याला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या वादात तो त्याला नौदलाच्या रुग्णालयात घेउन आला होता. मी त्या कर्मचार्याची तपासणी करू लागलो तेवढ्या वेळात तो नौदल अधिकारी तेथून पसार झाला. मी त्याची तपासणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्याच्या घोट्याला वाईट फ़्रैक्चर आहे आणि त्याची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे.

ही शिक्षा पुरेशी आहे का?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/06/2013 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/pune-news/violate-traffic-rules-cause-of-accide… ह्या बातमीनुसार एका शिवनेरी व्हॉल्व्हो चालकाने गाडी बेजबाबदारपणे वेगाने हाकली त्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर मयत माणूस हा त्याच्या घरातील एकमेव कमावता माणूस होता. कोर्टाने शिक्षा व्हायलाच पाहिजे वगैरे ठणकावून सांगितले आहे पण एका कुटुंबाची वाताहत होण्यास कारणीभूत ह्या चालकाला फक्त एक महिना कैद इतकीच शिक्षा? अशा किरकोळ शिक्षेने काय जरब बसणार आहे?

एक स्वप्न प्रवास (१२)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 23/06/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/18224 प्रिय अ‍ॅन बरेच दिवस. खरेतर बरेच महिने झाले तुला काही लिहीले नाही. पण तुला चॅटवर दिलेले प्रॉमिस मात्र मी अजून विसरलेलो नाहीय्ये. तुला स्वप्नात येवून भेटायचे दिलेले प्रॉमिस पूर्ण करणे हा माझे जन्मदत्त कर्म आहे. ते मी पूर्ण करणारच. ही वाक्ये ऐकून तुला लोकमान्य टिळकांची आठवण झाली असेल. कदाचित नसेल ही. तू लोकमान्य टिळकाना ओळखत नसशील. मलेशियात शाळेत ती शेंगा खाल्याची गोष्ट शिकवतात की नाही ते माहीत नाही अन्यथा टिळकांची आठवण झाली असती. असो. मागच्या प्रोजेक्ट ने माझी झोप पार उडवून टाकली होती.

फुकटची समाजसेवा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 23/06/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझा मूळ पिंड समाजसेवेचा नाहीच. इतर लोकांच्या सारखी सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी पण करतो . पण वैद्यकीय व्यवसायात फारसे कष्ट न करता समाजसेवा करता येते त्याचा हा एक वृत्तांत. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना ची गोष्ट आहे. तेथे दहा रुपयाचे कार्ड काढले कि कोणतीही सेवा ( औषधासकट) फुकट मिळवता येत असे यात फक्त कर्करोगाची औषधे अंतर्भूत नव्हती ( कारण कर्करोगाचे उपचार तेथे सिव्हिलियन साठी नव्हते ) मी तेथे क्ष किरण विभागात कामाला होतो आणि आर्मीच्या हिरवट खाकी(OLIVE GREEN) गणवेशात मी एकटा नौदलाच्या पांढऱ्या वेशातील बगळा होतो. त्यामुळे रुग्णांना मला ओळखणे फार सोपे होते.

चहा आणि कॉफी

लेखक sanjivanik१ यांनी रविवार, 23/06/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा आलाय. आता पावसाळी सहली ची मजा लुटायला, चटपटीत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण सगळेच सज्ज होतो. नुसता गरमागरम चहा , चहा आणि गरमागरम भजी हा त्यातलेच स्वर्गीय आनंद देणारे मेनु. मुसळधार पडणारा पाऊस आणि चहा हे एक वेगळीच नशा चढवत . पण कॉफी ???? तिची नशा मला चहा एवढी काही धुंद करणारी वाटत नहि. एक तर लहान पण पासून चहाशी असलेल एक नात. ते कॉफी बरोबर काही जडल नहि. तिची जवळीक साधली ती ऑफिस च्या निमित्ताने . झोप उडवण्याची ताकत तिची चहा पेक्षा जास्त पण तरीही चहा तो चहा.

पनीर आणि मॅगीची (न्युडल्सची) भजी

लेखक नेहरिन यांनी रविवार, 23/06/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- maggy चे छोटे (५ रु. वाले) पाकिट , १/२ वाटी बेसन , १/२ वाटी किसलेले पनीर , १ हिरवी मिरची , चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल . https://lh5.googleusercontent.com/-3P1Ktn41AP4/UXLZWdxJqxI/AAAAAAAABBY/mD_P5htnpyA/s640/20042013%2528007%2529.jpg कृती :- प्रथम नेहमी प्रमाणे maggy शिजवून गार करून घ्यावी .शिजताना मॅगिचे पाकीटातील मसालासुद्धा घालावा. एका बाउल मध्ये बेसन, पनीर , मीठ , एकत्र करावे त्यात मिरची बारिक चिरून घालावी.

चारधामच्या निमित्ताने

लेखक तिमा यांनी रविवार, 23/06/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे. चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या.