Skip to main content

कास पठार : फोटो काढण्यासाठी फी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 31/08/2013 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कास पठारावर फुलांचा बहर सुरु झाला . (त्यानिमित्ताने फोटो/ प्रवासवर्णनं येतीलच ) पण ह्यानिमित्ताने वनविभागाने काढलेले दरपत्रक फेसबुक | सातारा ह्या पेज वर पाहण्यात आले . गाड्या प्रवेश फी , व्यक्तिगत प्रवेश फी , फोटोग्राफी फी , कचरा केल्यास दंड ,मागील वर्षीच्या वसुलीतुन आसपासच्या गावात केलेली कामे असे बरेच डिटेल्स आहेत त्यात . ( फेसबुक वरील फोटो इथे कसा शेयर करता येईल हे माहीत नसल्याने फोटो देता आलेला नाही) ह्यातला "फोटो काढण्याची फी " हा प्रकार फार खटकला . प्रवेश फी वाहनांवर फी समजु शकतो , फुलाम्चे नुकसान अन प्रदुषण पसरवणे ह्यासाठी दंड असणे ही लॉजिकल आहे .

भरतनाट्यम मार्गदर्शन हवे आहे..

लेखक शिवोऽहम् यांनी शुक्रवार, 30/08/2013 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला मदत, मार्गदर्शन हवे आहे. माझी मुलगी, वय वर्षे ८, गेली दीड-दोन वर्षे पुण्यात भरतनाट्यम् शिकते आहे. तिच्या ग्रुपला ह्या वर्षी पुण्यात झालेल्या नॅशनल हार्मनी 'भाव-राग-ताल' ह्या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा 'अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे' या संस्थेने आयोजित केलेली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतुन लोक आले होते, इतर राज्यातुनही (आसाम, पंजाब, हरियाणा इ.) आले होते. भरतनाट्यम मध्ये मात्र दाक्षिणात्य कोणी आलेले दिसले नव्हते. या उत्तेजनार्थ बक्षिसामुळे तिला पुढील स्पर्धेसाठी सरळ प्रवेश मिळाला आहे असे आम्हाला समजले आहे.

मोदक कार्यशाळा!

लेखक टक्कू यांनी शुक्रवार, 30/08/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीला येतोय. आपण सर्वजण त्याला नैवेद्य दाखवतो त्याच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच मोदकांचा! तुम्हाला सर्वांना सांगायला मला खूप आनंद होतोय कि मी मोदक कार्यशाळा घेत्ये या रविवारी १ सप्टेंबर ला ठाण्यामध्ये. जर तुम्हाला किंवा तुमच्या माहितीपैकी कुणाला मोदक शिकण्यात रस असेल तर कृपया मला reshma.oka@in.com वर संपर्क करा. या कार्यशाळेत उकडीचे, उपासाचे व तळणीचे असे तीन प्रकारचे मोदक शिकविले जातील.

Sankshi Fort. सांकशी किल्ला

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शुक्रवार, 30/08/2013 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
13 August 2013 सकाळी ०७:०० वाजता डोंबिवली पनवेल बस ने पनवेल ला पोहचलो. काही जण अंबरनाथ,कल्याण येथून येणार होते तर काही जण ठाणे येथून,पोहोचताच बस स्थानकासमोरील "हॉटेल विसावा" येथे गरमागरम कांदेपोहे आणि चहाचा समाचार घेतला, आलात कि लगेच" विसावा त " या असा फोन सर्वाना केला होता, आमचा सरदार संजय पाटील आधीच विसावात विसावला होता. या ट्रेक ला विशेष उपस्थिती होती अमरावती युनिट ची सदस्य प्राची, श्रीकांत आणि अनिरुद्ध यांची, विशेष यासाठी कि हि तिघही YHAI च्या वेगवेगळ्या युनिट ची सदस्य आहेत(एकाच कुटुंबातील असूनही ) डोंबिवलीचे डॉक्टर वसंत भूमकर हे सुध्दा आमच्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेक ला आले होते.

मनमोहन सिंग - हे तुम्हाला जमेल का हो ?

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 30/08/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दहा एक वर्षे भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असणारे. गेले तीन वर्षे " आता महागाई कमी " होईल असा सूर लाउन रड्णार्‍या जनतेला " उगी उगी" म्ह्नणणारे शेतकर्‍याना ५०००० कोटी कर्ज माफी देणारे, जादूची कांडी माझ्याकडे नाही असे म्हणणारे व तरीही जादूची काडी वाटेल असे अन्न सुरक्षा बिल आणणारे मनमोहन सिंग हे एकदा बोलते झाले. लोकसभेतील आपल्या भाषणात त्यानी ब्राजील व तुर्कस्तान कडे बोट दाखवून भुकंपात त्यांचे हे घर कोसळायला आले आहे नुसत्या माझ्या घरावर टीका काय करताय असा सूर लावला.

पुरुष विभाग धागा क्र.३---- संसार देवाची कहाणी-----

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/08/2013 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो (मित्र खोटे बोलत नाहीत, हे मी आधीच पु.वि.धा.क्र.२ मध्ये स्पष्ट केले आहेच.... http://www.misalpav.com/node/24546 ) नमनाला इतके तेल खूप झाले.

" अचानक"

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं... आणि अचानक लाईट गेले . असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं. अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली. आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं ) उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? ) --- पायात चप्पल घातली .

"स्वामी तिन्ही जगाचा"

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
गोंडस रुप तुझे, घेतले डोळ्यात भरुन। बोबडे तेझे बोल, ठेवले हृदयी कोरुन॥ दुडू दुडू चाल तुझी, पायी खणकतो वाळा। दॄष्ट लागेल म्हणोन, लावला काजळाचा टिळा॥ चिऊ काऊचा करुन, भरविला दुध-भात। पोट भरताच तुझे, धरीसी तू माझा हात॥ काम करता करता, हाती पाळण्याची दोरी। झोप लागावी म्हणुन, ओवी होती ओठावरी॥ लागलास चालायला, आंगण झाले थोडे। होई काळ्जाचे पाणी, जेंव्हा दॄष्टीस न पडे॥ जमविले सवंगडी, खेळ मांडला दारात। जेवायला किती वेळा, बोलाविले मी घरात॥ तहाण भूक विसरुन, खेळ खेळ्ण्यात रंगला। लागला मित्रांचा संग, आईलाच विसरला॥ आईविन नाही माया, असो रंक अथवा राव। ठेच लागताच येते, मुखी आईचेच नाव॥ सर्व मिळेल विक

दहीहंडी

लेखक सुहासदवन यांनी शुक्रवार, 30/08/2013 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा) काही वर्षांपूर्वी दिवसा उजेडी साजरा होणारा हा सण, आता उत्सव बनून संध्याकाळ, अगदी रात्र झाल्याशिवाय रंगातच येतच नाही (ढंगात तर तो केव्हाही नव्हताच).