"बहर" डॉक्टर श्रीश क्षीरसागर
१००/१२५ वृक्षांची ओघवत्या शैलीत, सचित्र ओळख करून देणारे एक बहारदार पुस्तक.
श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर सावली धरणाऱ्या "अजान" वृक्षा पासून संपूर्ण भारत भरातल्या गोड्या पाण्यावर तरंगणार्या "जलकुंभी" पर्यंत अनेक वृक्ष ,त्यांचे मूलस्थान, पर्यावर्णातील त्यांचे महत्व, महती आणि माहिती सांगणारे हे पुस्तक हातात घेतले कि ठेववत नाही. अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिठ्य आहे.
नाशिकच्या दैनिक "गावकरी" मध्ये "बहर' याच नावाने यातील काही लेख डॉक्टरांनी प्रकाशित केले होते. वाचकांचा प्रतिसाद पाहून हे सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले आहेत.
मिसळपाव