सुपर स्ट्रेसबस्टर
माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन."
दुसर्या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता.
मिसळपाव
कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट(Dr. Fred Urquhart). खिडकीत तासनतास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला.