पुणे :
पुणे हे एक ऐतिहासीक शहर आहे.औरंगाबाद देखील तसेच आहे. मात्र औरंगाबाद मध्ये आलेल्या पाहुण्याना फिरवण्यासाठी बीबी का मकबरा , पाणचक्की यासारखी स्थळे दाखवता येतात.
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.
“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.
“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.
“कसली दुरुस्ती?