Skip to main content

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/10/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो. सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only.

एक महाचित्रपट

लेखक तिमा यांनी सोमवार, 21/10/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी. एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन...

अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.

लेखक गवि यांनी सोमवार, 21/10/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.." खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला. नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं.

मुलं - काही नोंदी

लेखक मितान यांनी सोमवार, 21/10/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय..

मी....

लेखक घन निल यांनी सोमवार, 21/10/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुखः माझे एकट्याचे एकलाच भोगतो मी … रात्रीस चांदण्यांसवे एकटाच जागतो मी … मी दिले तुला माझे आकाश चांदण्यांचे … कैफात निखळले जे रुपेरी तारे मोजतो मी …. माझ्या ओल्या जाणिवांची खुलीच होती कवाडे … आठवून तुझे धुमारे एकटाच लाजतो मी …. मकरंद तुझ्या ओष्टीचा अजुनी ओठांस आहे … ओलावल्या आठवांत एकटाच भिजतो मी … घनभार तुझ्या केसांची ती किरमिजी संध्याकाळ … प्राक्तनात माझ्या फुले वेचतो मी …. जगलो एकच पहाट जी तुझ्या मिठीत उगवली …. ओथंबल्या दवांत एकटाच नाचतो मी …
काव्यरस

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 21/10/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/10/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला! 1 ६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन! हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे.

आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 21/10/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
६- आचरणे व सोहळे (Rituals & Events) यांचा एक कायमस्वरुपी मजबुत कार्यक्रम. अशा CULT मध्ये शिष्यांना कायम दोन पातळींवर एक कार्यक्रम दीलेला असतो आणि तो काटेकोरपणे अमलात आणणे यातच कशी अवघ्या जीवनाची सार्थकता आहे हे सतत हॅमरींग केले जाते. यात वैयक्तीक पातळीवर आचरणाची असंख्य नियम व कामे (Rituals) नेमुन दीली जातात.यातील बहुसंख्य ही सोपी परंतु निर्बुद्ध आणि प्रचंड repetitive अशी असतात. यात काय खावे काय नाही, कुठल्या दीवशी ,कपडे इ. संबधी चे असंख्य नियम, अमुक इतके तास दररोज अमुक एक क्रिया करणे.

अजून आहे मी वनवासी

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 21/10/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी युगायुगांची फरफट,
काव्यरस