Skip to main content

होतीच तशी वेळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 08/11/2013 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
होतीच तशी वेळ, तिचं बोलावणं आलं होतं सगळी कामे दूर सारुन ,जाणं भागच होतं ठरवलेल्या ठिकाणी ,वेळेआधीच गेलो कोपर्‍यात एका, तिची वाट बघत उभा राहिलो इतक्यात नजर समोर गेली आणि मनाची खुण पटली इंद्रधनुषी रंग फुलवत,माझ्याकडे ती आली सुचेना काय बोलु, सुरुवात तिनेच केली काहीतरी चुकत होते, गालावर तिच्या नव्हती लाली संपताच तिचे बोलणे,पाठ फिरवुन गेली दूर जाणारी पावले,अश्रुंनी दिसेनाशी झाली आणि काय सांगू,बाजुने वाहता रस्ता मध्ये सुन्न होउन, मी उभा नुसता

mobile बद्दल मदत / मार्गदर्शन

लेखक Madhavi_Bhave यांनी शुक्रवार, 08/11/2013 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही, पण मला मार्गदर्शन हवे आहे आणि मिसळपाव मंडळींसारखी योग्य माहिती दुसरे कोण देणार? मला mobile घायचा आहे. बजेट रु. १५००० ते १७०००/- पर्यंत आहे. मला शक्यतो चांगला कॅमेरा व सुस्पष्ट आवाज पाहिजे. इंटरनेट fast हवे जे mainly मला office mails वगैरे check करण्यासाठी पाहिजे. Whatsapp इत्यादी मी वापरते पण म्हणून मी काही youtube फ़ैन वगैरे नाही अहे. कधीतरी गाणी ऐकायला चालतात. चांगली memory हवी आहे कोणतरी nokia लुमिया घे म्हणून सांगतय, कोण samsung ला पर्याय नाही म्हणते तर कोण Micromax घे म्हणून सांगत आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतरचा झांगडगुत्ता : एक सोल्युशन

लेखक खटासि खट यांनी गुरुवार, 07/11/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे पाच वर्षांनी निवडणुका येणार. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले. काही काळजीत पडले, काही बोहल्यावर चढले, काही लाल किल्ल्यावर चढून बसले, काही टवाळ मोडात गेले, काही मवाळ मोडात गेले तर काही मौनात गेले. पण कर्णपिशाच्चाने सांगितलं कि सगळेच आपटणार म्हणून. च्यायला, सगळ्यांना कधी ना कधी चान्स मिळाला, आता कुणाला चुना लावताय या मोडात मतदार आहे. त्याला जास्त चुना लावायला गेलं तर जाळ होणार यात शंका नाही. तर एकंदर २०१४ च्या निवडणुकीनंतर जाम झांगडगुत्ता होणार हे दिसतंच आहे. कुणालाच लोणी नाही. दोन बोके आणि बरीच माकडं अशी नवीन गोष्ट ऐकायला मिळेल.

तरुण तुर्कांनो व ज्येष्ठ अर्कांनो प्रेमकोषा च्या निर्मीतीस योगदान द्यावे ही प्रेमळ विनंती !

लेखक मारवा यांनी गुरुवार, 07/11/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील तरुण तुर्कांनो आणि ज्येष्ठ अर्कांनो प्रेमात पडलेल्या ,पडु इच्छीणारे आजी-माजी प्रेमवीरांनो यंदा च्या दिवाळी ला एक महान मिपा प्रेम-कोष तयार करुन समाजसेवा करण्याचा मानस आहे. की जेणेकरुन भावी आणि सध्याच्या प्रेमी जीवांना एक रेडी रेकनर प्रेम फ़ुलविण्यास, प्रेयसी ला आपले प्रेम पटवुन देण्यास उपयोगात येइल आणि ज्या योगे एक ऐतिहासिक महत्वाचा विश्वकोषा च्या धर्तीवर प्रेमकोष बनु शकेल. याने प्रेम या संकल्पने वर एका जागी सुंदर असे साहीत्य ही जमा होइल. यात आपण उदार हस्ते आपल्या जवळील प्रेम खजिना शेअर करुन प्रेमकोष निर्मीतीस योगदान करावे ही प्रेमळ विनंती !.

अस्तित्वाच्या पल्याड..

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 07/11/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ नदीच्या पैलतिरावर, जललहरींसह वाहत गेली दूर तिथे स्वप्नांची घागर... त्या तीरावर गोकुळनगरी कान्हाची बेधुंद बासरी पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले निळसर निळसर सर्वार्थाने देह लाजला पाहताच तो रोखुन मजला नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर हळूच जवळी आला कान्हा छेडित नाजुक अधरफुलाना भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन गेला तो मुरलीधर हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुर ©अदिती शरद जोशी
काव्यरस

आयुष्याचे चतकोर.....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 07/11/2013 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पाश्चिमात्यांनी अर्थक्षेत्र चार भागात विभागले आहे
  • नोकरी (EMPLOYEE)
  • स्वयंरोजगारी (SELF EMPLOYED)
  • व्यवसाय (BUSINESS OWNER)
  • गुंतवणूकदार (INVESTOR)
आपण म्हणतो
  • उत्तम शेती
  • मध्यम व्यापार
  • कनिष्ठ नोकरी
म्हणजे गुंतवणूकदार हा दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम मानला जातो आणि नोकरी करणारा कनिष्ठ. पण उत्तम असो कि कनिष्ठ आपल्यापैकी प्रत्येकजण आर्थिक सुरक्षेची इच्छा बाळगतो आणि आर्थिक स्वातंत्र्याची स्वप्न पाहतो .

अजुन ही एकटा आहे

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 07/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक

तू गेलीस मला सोडून....

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 07/11/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलीस मला सोडून म्हणून मी जगायचं थांबलो नाही तू लांबवलंस मला तुझ्यापासून म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही तरी पुढे करायचं काय ते कळेना मला माझंच मेलेलं मन मिळेना मला मन कुठेतरी हरवलं होतं, आणि काय करायचं ते वेंधळ्यासारखं मी मनातल्या मनातच ठरवलं होतं काय करायचं होतं आयुष्यात ते मला आठवेना मेंदू बधिर झाला माझा, एकही ऑर्डर पाठवेना कल्पकता मेली माझी, डोळे मिटले की तू दिसायचीस स्वप्नांनाही कंटाळलो मी, कारण त्यांतही तूच असायचीस मी हसलो, की तुझं हसू आठवायचं मी रडलो, तरी तुझं हसूच आठवायचं तुझ्या डोळ्यातली आसवं मला ना कधी बघवत होती तुझ्या हस-या चेह-याची आठवणच मला जगवत होती. तू भांडायचीस तेव्हा मी

निसर्गाला काही फरक पडत नाही!!!!!!!!!!!!!

लेखक वडापाव यांनी बुधवार, 06/11/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!!

जपू एकट्याने घडी जीवनाची...

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 06/11/2013 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
नको ओढ ती रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची नको फार गुंता आता जीवनात नको अडकणे रे कुणात,कशात पुरे जाहले रोज झुरणे अवेळी पुरे जाहले आठवांचे उसासे तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे आता सावरू दे मनाला जरासे कधी बंध तुटले,कळलेच नाही मला तू,तुला मी उमगलेच नाही आता ओढ अश्रूंत वाहून गेली सुखाची मनाशी चुकामूक झाली गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे आता ना तमा रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची... © अदिती