Skip to main content

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/02/2026 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे.

‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 16/02/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो !

वेड्या आईची वेडी माया

लेखक रानरेडा यांनी रविवार, 15/02/2026 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा. खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता . रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची.

अभंग

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 15/02/2026 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेत नाही । फिरकले पायी । महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।। जुने मढे सारे । काढिले बाहेरी । नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।। एपस्टिन यादी । येईल बाहेरी । हीच भीती उरी । दाटलेली ।।३।। शिक्षण, बेकारी । तशी महागाई । बोलणेच नाही । विषयांवर ।।४।। आत्महत्या करी । राजा शेतकरी । जंगले व्यापारी । लुटविती ।।५।। निवडणुकीवेळी । गोड गोड बोली । वचनांची झोळी । रिकामीच ।।६।। सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव । जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।। संसदेचा वेळ । वायाचि गेला हा । 'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

भारत-म्यानमार फाळणी

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 14/02/2026 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

पकडले हाथ रंगे

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 14/02/2026 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रालयात ढेरंगे, पकडले हाथ रंगे अन्न नागरीलिपिक, लाचखोरीचे पीक, असे इमान ना विक, पांडुरंगा || ३५ हजार रोकड आता शोधा बोकड, आरोपांचा हा फड कसा वाचवू मी गड एकनाथा || लाचखोरी शेवाळ, वदले ते झिरवाळ, लोक म्हणे कपाळ, धूर तिथेच जाळ, 'देवा' धाव || लाचखोरी प्रकरण, नाही चुकीचे करणं, हो तेच माझे दालन, राजीनामा हे मरण, नरहरी ||