खिम्याचे उन्डे
जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी
साहित्य:
१ किलो खिमा
१ चमचा आल्-लसुण पेस्ट
३ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा धने मसाला
मीठ
तेल
कृती:
प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे.
नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ
घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे.
आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी.
मिसळपाव