Skip to main content

सिंहगड व्हॅली

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 05/01/2014 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सिंहगड व्हॅलीला कसे जायचे याबद्दल माहिती हवी होती. वन विभागाच्या चेकपोस्टजवळ (जिथे प्रवेश शुल्क आकारल्या जाते) कुठे तरी आहे ती पायवाट असे ऐकले आहे. फॉन्ट साईझ वगैरे गंडले तर माफ करा, मोबाइलवरून आलोय हाटेलात. धन्यवाद. :)

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 05/01/2014 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन संपेल याची ग्वाही देतो. पुढचा लेख तयार आहे, लगेच टाकणारही आहे. यापुढे असे होणार नाही.

केरळ भटकन्ति.

लेखक महायोग यांनी रविवार, 05/01/2014 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारि महिन्यात केरळ ला फिरयला जायचे आहे. क्रुपया चान्ग्लि होटेल्स व स्थळे सुचवा.

शतशब्दकथा कशी असावी?

लेखक खेडूत यांनी शनिवार, 04/01/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा या कथा प्रकारावर मनात आलेले उलट-सुलट विचार शब्दात पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यात अजून भर घातल्यास नव्याने अशी कथा लिहिणाऱ्याला मार्गदर्शक होईल असे वाटते . अतिवास यांनी लिहिलेली शतशब्दकथा मिसळपाव वर मागच्या वर्षी पहिल्यांदा वाचली तेव्हाच छान वाटली. म्हणजे या प्रकाराचं हे नाव नंतर ठरलं- तेव्हा आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं इतकंच. मग कथा पुन्हा एकदा आवडली. एका छोटीच्या निरागस मनातले विचार विविध प्रसंगातून वाचायला मिळत आहेत. नंतर मीही एक शतशब्द कथा लिहून पाहिली. मस्त वाटलं. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेवर होती म्हणून सोपं गेलं.

अर्थक्षेत्र भाग - ५ - गुंतवणूक

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 04/01/2014 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
"सामान्यतः मला काहीच येत नाही असे गृहीत धरूनच आपण दुसर्याला "संधी " देतो. त्या ऐवजी आपण स्वतः जर सगळी माहिती काढून सर्वसमावेशक तयारी केली म्हणजेच थोडक्यात स्वतःलाच प्रथम "संधी" दिली तर एक अतिशय मोठा धोका आपण टाळू शकतो आणि पुढचे संभाव्य धोके परतवण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो."
माझे एक अशील श्री हेरंब जोशी, ह्यांनी प्रथम स्वतःला "संधी" दिली. व्यवसाय भिक्षुकी नोव्हेंबर २००० साली त्यांनी रुपये १३५००० नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या नावे बँक ऑफ बरोडामध्ये फिक्सला ठेवले.

अदभूत शास्त्र

लेखक सचीन यांनी शनिवार, 04/01/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ज्योतिष ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला ज्योतिष विद्येमुळे कळते. भविष्यात होणारे आजार, मिळणार असणारी नोकरी ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे. सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल. पण ज्योतीशाना मात्र भारताचे भविष्य माहित असणार कोण निवडून येईल कोणाला किती मते मिळतील तेही माहितच असणार.

नवे देव आणि त्यान्चे नवे भाव

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 04/01/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाव तेथे देव, मग नवीन देव आले तर नवीन नकोत का भाव? विसरा जुनी माहिती, जुन्या पद्धती, खूप ऐकले असेल भाव तेथे देव, पण आता नवीन पद्धती आणि त्यांत "भाव" कसा ठरवावा हे माहीत आहे काय? "प्रयत्नांती परमेश्वर" असेल अनेकदा ऐकलं, पण त्याचाच आता नवा "अर्थ" काय ?

सामान्य

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/01/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर.

अर्थक्षेत्र भाग - ४ - गुंतवणुक करण्यापूर्वीची तयारी.

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 04/01/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण काही हजार वर्षांपूर्वी माणूस शेती ह्या विषयाच्या संपर्कात आला. (नक्की किती हजार वर्षापूर्वी ते आमचे इ.ए. साहेब सांगू शकतील.) तिथून तो स्थिरावला. वस्ती करून राहू लागला. तेव्हा त्याला शेतीचे नियम, थिअरीज काहीहि माहित नव्हते. त्याला फक्त एक जाणवले असावे की इथे तिथे शिकार करत पळत राहण्यापेक्षा हे च्यामारी बरय झाडे आहेतच, फळे येताहेत असेच राहू झाल! जमल्यास अगदी सहज शक्य झाल्यास ज्या बाबतीत आपण पारंगत आहोत ती शिकार हि करू पण आता ती दगदग, धावपळ थोडी कमी करू..... खूप रिस्क होती......

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास भाग १: नरसिंह रावांची घोडचुक

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 04/01/2014 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरण निर्माण करायला हातभार म्हणून स्वातंत्रोत्तर भारताच्या राजकीय आणि निवडणुकांच्या इतिहासावरील एकूण १२ भागांवरील या लेखमालेतील हा पहिला लेख सादर करत आहे.ही लेखमाला मी माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत लिहिली होती.ही लेखमाला chronological order मध्ये नाही.