Skip to main content

एक सुखाचा रविवार

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 12/01/2014 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात.

एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 12/01/2014 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे.

प्रीत खुळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 12/01/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी ……………………… अज्ञात
काव्यरस

गुलाबाचे फळ

लेखक रम्या यांनी रविवार, 12/01/2014 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात. काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही!

अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 12/01/2014 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक : headphone वर गाणे ऐकत बसलो होतो . बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? " "आतिफ अस्लम ." त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही . "तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत .

संबंध

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 11/01/2014 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख मी खालील लिखाणाला पुरवणी म्हणून काढत आहे. श्री खटासी खट यांनी काढलेला धागा http://www.misalpav.com/node/26446. यात माझे स्वतःचे काही अनुभव मला विशद करायचे आहेत. मुळात स्त्री पुरुष संबंध (केवळ शरीर संबंध नव्हे) या बद्दल मला फार कुतूहल आहे. माझे लग्न होऊन २१ वर्षे झाली आहेत आणि ते बर्‍यापैकी सफल आहे असे मला वाटते. वैद्यकीय शास्त्र शिकून त्याबद्दल थोडीफार शास्त्रीय माहिती मिळाली तरीहि बहुसंख्य गोष्टींबद्दल अजूनही खूप कुतूहल बाकी आहे.

क्षितिजावरले तरंग

लेखक मीराताई यांनी शनिवार, 11/01/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
या खिडकीशी मी असा एकटाच बसलेला असतो.खिडकीचा कट्टा चांगला रूंद आहे. त्यामुळे अंगाचं मुटकुळं करून मला तिथे छान बसता येतं. ही खोली तशी घरातल्या एका बाजूला आणि खिडकी तर आणखीनच एका कोपऱ्यात. त्यामुळे घरात वावरणाऱ्यांना मी दिसत नाही नी मला ते! करायचंय काय म्हणा दिसून तरी! मी बोलतो ते त्यांना पटत नाही अन् ते बोलतात ते मला पटत नाही. घरातले काय न् बाहेरचे काय, माझं बोलणं पटेल असं भोवताली कोणीच दिसत नाही मला. मग बोलायचं तरी कुणाशी? कधीतरी वाटतं एकटा आहे मी, अगदी एकटा! या संपूर्ण जगात माझं असं कुणीच नाही. मी ज्याच्याशी अगदी मन उघडं करून बोलेन, ज्याला ते सगळं कळेल, पटेल, असं कुणी कुणी नाही.

ट्रोजन युद्ध भाग २.५ - पॅट्रोक्लसचा अंत्यविधी आणि प्रिआमची यशस्वी गांधीगिरी-हेक्टरचा अंत्यविधी.

लेखक बॅटमॅन यांनी शनिवार, 11/01/2014 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ पॅट्रोक्लसचा अंत्यविधी मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला

ट्रायफल पुडींग

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 11/01/2014 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाककृती मला आंतर जालावरील शोध मोहिमेत मिळाली. पाकृ. सोपी आहे, पण मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि सगळ्याना खूप आवडली. साहित्यः अर्धा कि. मिक्स्फ्रुट एगलेस केक, ( आपल्या आवडीनुसार कोणताही, चॉकलेट सोडून), दोन चमचे फ्रुट ज्युस, इन्स्टंट ऑरेंज जेली पाकिट ५० ग्रॅ., व्हॅनिला कस्टर्ड पावडर दोन टे. स्पून, साखर चार टे. स्पून कस्टर्डसाठी, एक सफरचंद+ दोन टी स्पून साखर, अर्धा ली. दूध, एक केळं, एक वाटी जास्तीचे दूध, बदाम काप, चेरी सजावटीसाठी. कृती: पाकिटावरील कृतीप्रमाणे जेली सेट करावी. सफरचंदाच्या साली काढून लहान लहान फोडी कराव्या. त्यात दोन टीस्पून साखर घालून पाच मिनिटे गॅसवर ठेवावे.

"माझे मन तुझे झाले"

लेखक बरखा यांनी शनिवार, 11/01/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा विषय लग्नाळु मुलगा आणि मुलगी या॑च्या बद्द्ल आहे. (तशी मी लिखाणात सराईत नाही, पण जे मनात आहे ते मा॑ड्ण्याचा हा प्रयत्न आहे. तरी समस्त मिपाकर आणि मिपा चे टिकाकर यातिल भावना समजुन घेतिल, बाकी टिका॑सहित मिपाकरा॑च्या हाति.) वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ति॑नी "लग्न" या विषयी योग्य ते मार्गदर्शन करावे. माझ्या आज पर्यन्तच्या जीवन प्रवासात मी अशी मुल-मुली बघितली आहेत ,कि जी लग्न करताना त्या॑ना स्थळ कस हव असत हे ते ईतक पक्क ठरवतात कि त्यात तसुभर देखिल बदल करायला तयार नसतात. ब-याचदा सगळ चा॑गल (स्थळ) असताना देखिल त्या॑च्या अटीत बसत असताना देखिल कधी कधी त्या व्यक्तिला नकार देतात.