✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शरीरसंबंधांना नकार हे क्रौर्य ????

ख
खटासि खट यांनी
Mon, 12/16/2013 - 09:27  ·  लेख
लेख
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG (बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय). न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणे हा उद्देश नाही. हा निकाल कोणत्या कायद्यामुळे दिला असावा अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. शरीरसंबंधांना नकार या गोष्टीकडे मानवी हक्काच्या दृष्टीने पाहता येणार नाही का ? बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय. मग या निकालामुळे ती व्याख्या चुकीची ठरतेय का असे कैक प्रश्न उभे राहतात. गोंधळ होतोय अशा परस्परविरोधी माहीतीमुळे. दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ? कदाचित कारण समजले असते आणि उपायही सापडला असता. बाई आहे म्हणून तिच्या नकारामुळे इगो हर्ट झाला असेल का ? लग्नाच्या आधीच एकमेकांना समजून घेतलं असतं तर या गोष्टी टळल्या नसत्या का ? हेच जर पुरुषाच्या बाबतीत घडलं असतं तर त्या बाईला लगेच घटस्फोटाचा अर्ज देता आला असता का ? न्यायव्यवस्थेत महिलांचं प्रमाण वाढायला हवेय का असे प्रश्न अशा निकालांमुळे पडतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12975 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

एक घाव

मारकुटे
Mon, 12/16/2013 - 09:46 नवीन
समलिंगी संबंध आणि लिव ईन हेच समस्येवरचे उत्तर आहे. त्यामुळे स्त्रीमन पुरुषमन कळले नाही, समजावून घेता आले नाही वगैरे फापटपसारा नकोच. आणि ज्याच्याशी जमत, ज्याला जमत, त्याच्याशीच संबंध ! जै हो !
  • Log in or register to post comments

अहो साहेब,

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 10:00 नवीन
अहो साहेब, तुम्ही लै भारी खेळाडू असला तरी दुखापतग्रस्त म्हणून टेबलटेनिसच्या मैदानात लॉन टेनिस खेळू शकाल का ? प्रतिक्रिया देताना जरा तरी संबंध जोडा कि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

अगागागागागागा.....!

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/16/2013 - 11:07 नवीन
अगागागागागागा.....! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो

मारकुटे
Mon, 12/16/2013 - 16:43 नवीन
आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो. तुम्हाला जमत नाही त्याला आम्ही काय करणार? ऑ !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

ब्वॉर !!

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 18:55 नवीन
ब्वॉर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

बलात्काराच्या व्याख्येत जर

ऋषिकेश
Mon, 12/16/2013 - 11:17 नवीन
बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय.
चुकीची माहिती. बलात्काराच्या व्याख्येमध्ये लग्नाच्या जोडिदारांना वगळलेले आहे.
  • Log in or register to post comments

नक्की का ? कायद्यात हल्ली बदल

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/16/2013 - 12:17 नवीन
नक्की का ? कायद्यात हल्ली बदल झालेत की इतकी वर्ष चुकीचे ऎकत होतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

इथे बघा

ऋषिकेश
Mon, 12/16/2013 - 14:42 नवीन
इथे बघा यात What is Rape? या प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी Exception दिले आहे. बाकी हा कायदा पहिल्यापासून असाच आहे. यात बदल व्हावा अशी मागणी अनेकदा होते. (न्या.वर्मा कमिटीची शिफारसही होती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जीव भांड्यात पडला

खटपट्या
Tue, 12/17/2013 - 00:04 नवीन
जीव भांड्यात पडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कसलं तळमळीने लिहीलयं हो..

शैलेन्द्र
Mon, 12/16/2013 - 11:20 नवीन
कसलं तळमळीने लिहीलयं हो.. :)
  • Log in or register to post comments

छोड दिया. दुखापतग्रस्तांची

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 11:44 नवीन
छोड दिया. दुखापतग्रस्तांची संख्या वाढवण्यात सध्या इंटरेस्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

गैर्समज चालुद्या...

शैलेन्द्र
Mon, 12/16/2013 - 12:54 नवीन
गैर्समज :) चालुद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

नकार हे क्रौर्य नाही

कौन्तेय
Mon, 12/16/2013 - 11:27 नवीन
नकार हे क्रौर्य नाही. पण त्या आधारावर नवर्‍याला घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी मोडते घातले गेल्यास सामान्य दृष्टीने क्रौर्य ठरेल. अर्थात या बातमीत नि वरच्या नोंदीत 'क्रौर्य' ही संज्ञा न्यायिक अर्थाने अभिप्रेत आहे. त्यामुळे मी म्हटले तसे हे सामान्य क्रौर्य घटस्फोट मिळवण्यासाठी पायाभूत बनेल वा नाही सांगता येत नाही. विषय लवचिक आहे. प्रत्येकाच्या कामतृप्तीच्या व्याख्या नि गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यांत तडजोड करता न येण्याइतपत तफावत असल्यास नेमकं काय करायचं ते न्यायालय कसं सांगणार? ज्या जोडीदाराला 'पूर्ण संतोष' लाभत नाही त्याने (वा तिने) त्या कारणासाठी एक लफडे ठेवावे व त्याव्यतीरिक्त गुण्यागोविंदाने नांदावे असे न्यायालय कसे सांगणार? म्हणून या केसमधे घटस्फोटाचाच मार्ग योग्य होता असे वाटते. अपत्यप्राप्ती होईपर्यन्तचा काळ हा चाचणी कालखंडच समजला जावा ... नि त्या कालखंडात आता हे पुढे न्यायचे की नाही हा पूर्ण विचार करून अपत्य जननाचे पाऊल उचलले जावे. पण एकदा का अपत्य आले की मग मात्र आपले 'व्यक्ती' म्हणूनचे आग्रह बाजूला ठेवून अपत्यासकट सगळ्यांनीच केवळ कुटुंब म्हणून जगावे अशी पद्धत रूढ व्हायला हवी असे गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवत आहे. यात अनेक कारणांबरोबरच स्त्री-पुरूष दोघेही आपपल्या कामविषयक गरजांबाबत पूर्वी कधीही पेक्षा जास्त जास्त जागरुक झाल्यामुळेही अनेक जोडप्यांमधे वाद निर्माण होत आहेत. या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही. हीच पाळी त्या बाईवर नवर्‍याने वा नवर्‍यावर बाईने अपत्यप्राप्तीनंतर आणली असती तर त्या घटस्फोटाला दोष देणे योग्य ठरले असते. इथे नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

या केसमधे घटस्फोट झाल्याने

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 11:38 नवीन
या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही >>> न्यायालयाचं मत/ निकालपत्र हे पुढच्या केसेसमधे विचारात घेतलं जातं ना ? स्पष्टता नसेल तेव्हां जवळजवळ तो कायदाच समजला जातो हे खरं आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

प्रिसीडंट -

कौन्तेय
Mon, 12/16/2013 - 11:58 नवीन
तुम्हाला शुद्ध मराठीत प्रिसीडंट म्हणायचे आहे ना. प्रत्येक केस ही वेगवेगळी हाताळली जावी व अनुचित प्रिसीडंट तयार होण्याच्या भीतीपायी धाडसी निर्णय घेण्यास कचरू नये असा न्यायसंस्थेचा संकेत आहे. वकीली पेशाचा नाही. वकील लोक सोयिस्कररित्या नेमके मागच्या केसेसमधले संदर्भ काढ-काढून न्यायमूर्तींना भंडावून सोडतात नि खरे न्यायासन त्यातला नीर-क्षीर विवेक करून निर्णय देते. आपली चर्चा आदर्शतः काय व्हावे अशी असल्याने न्यायासन competent आहे असे गृहित धरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

मुद्दे मस्त मांडताय.

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 12:03 नवीन
मुद्दे मस्त मांडताय. पूर्वी न्यायालयाचे काही निकाल वाचनात आले होते. पाहण्यातही होते. न्यायालयाने घटस्फोटाचे अर्ज विचारात घेताना कुणाला आणखी एक वर्ष, कुणाला त्यापेक्षा अधिक काळ एकत्र घालवावा मगच घटस्फोटासाठी अर्ज करावा असं सुचवलं होतं. म्हणूनच पाच महीने हा काळ वाचून आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

कोर्ट हल्ली सगळी कडे हस्तक्सेप करते.

कुंदन
Mon, 12/16/2013 - 11:37 नवीन
आमचे साहेब पण हेच म्हणतात. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pawar-on-aap/articleshow/27439992.cms
  • Log in or register to post comments

कोर्टाशी संबंधित कुठल्याही

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 11:42 नवीन
कोर्टाशी संबंधित कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला सामान्यजन कचरतात. साहेबांना चिमटे काढण्यासाठी विशेष सूट असावी असं दिसतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

क्रौर्य म्हणजे काय

पैसा
Mon, 12/16/2013 - 13:04 नवीन
याची एग्झॅक्ट व्याख्या कशी करणार? पट्ट्याने फोडून काढणे हे उघड क्रौर्य आहे. पण एखाद्या अतिसंवेदनाशील माणसाला असा सतत नकार हा खूप मानसिक त्रास देणारा वाटू शकेल बहुधा. ते मानसिक क्रौर्य या व्याख्येत येईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments

डेझरटेशन.

प्रभाकर पेठकर
Mon, 12/16/2013 - 16:06 नवीन
घटस्फोटाच्या कायद्यात 'डेझरटेशन' असा एक मुद्दा आहे. सातत्याने शरीरसंबंधास नकार असेल तर दुसर्‍या जोडीदारास घटस्फोटासाठी 'डेझरटेशन'च्या मुद्द्याचा आधार घेता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

.

उद्दाम
Mon, 12/16/2013 - 13:04 नवीन
दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ? लग्न करतानाच धर्म अर्थ काम मोक्ष वगैरेसाठी लग्न करायचे हे आधीच कबूल केलेले असते. त्यामुळे नंतर पुन्हा समजूत घालत वेळ घालवून नवर्‍याने आपली जवानी बरबाद का करायची? द्विभार्यापर्तिबंधक कायदा रद्दच करुन टाक्ल्यास हे प्रश्न उद्भवणार नाहीत.
  • Log in or register to post comments

अहो !! असे घाबरवू नका… आम्ही

खटपट्या
Tue, 12/17/2013 - 00:14 नवीन
अहो !! असे घाबरवू नका… आम्ही (मी आणि बायको) गेले दीड वर्षे भेटलो नाही आहोत …. म्हणून लगेच घटस्पोट ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

अशा केसेस सहसा आधी

कवितानागेश
Mon, 12/16/2013 - 13:34 नवीन
अशा केसेस सहसा आधी कौन्सिलरकडे सोपवल्या जातात. त्यावेळेस नकारामागचं नक्की काय कारण आहे ते कळू शकतं. बातमीतली माहिती अर्धवट वाटली. असो. झाला का त्यांचा घटस्फोट? सुटूदेत बिचारे एकमेकांच्या तावडीतून!
  • Log in or register to post comments

बातमीतली माहिती अर्धवट वाटली.

खटासि खट
Mon, 12/16/2013 - 18:57 नवीन
बातमीतली माहिती अर्धवट वाटली. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माझ्यामते भारतात शरीरसंबंधास

ऋषिकेश
Mon, 12/16/2013 - 16:18 नवीन
माझ्यामते भारतात शरीरसंबंधास दिलेला तात्पुरता नकार/अनिच्छा हे सबळ कारण नाहिये. अश्या संबंधास दिलेला कायमा नकार / असे संबंधच न ठेवणे हे सबळ कारण आहे असे वाटते
  • Log in or register to post comments

भारतातच का, इन जण्रल कुठेही

बॅटमॅन
Mon, 12/16/2013 - 16:22 नवीन
भारतातच का, इन जण्रल कुठेही हेच कारण लागू होत असेल असे वाट्टे. शिवाय ५ महिने हा कालखंड त्या दृष्टीने मोठा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असो.

विनायक प्रभू
Mon, 12/16/2013 - 18:02 नवीन
हल्ली लग्न झाल्यावर १ वर्षात विविध कारणांनी हा प्रकार सूरु होतो. @बॅट्याला प्रश्न कळ्ळलाच नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅट्या

विनायक प्रभू
Mon, 12/16/2013 - 16:54 नवीन
तुला काय रे माहीत?
  • Log in or register to post comments

गुर्जी

बॅटमॅन
Mon, 12/16/2013 - 17:30 नवीन
अहो साधं लॉजिक आहे हे. लग्न झालेलं नस्ताना आणि सेक्स केलेलं नसताना ती उर्मी किती प्रबळ असते हे त्या अवस्थेतून गेलेला कोणीही पुरुष सांगू शकेल. लग्न झाल्यावरही भावनेचा निचरा व्हावा तसा होत नसेल तर फ्रस्ट्रेशन प्रबळ का होणार नाही? अन तेही एखादा महिना नाही तर तब्बल ५ महिने असेल तर डोके फिरेल नैतर काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर

मृत्युन्जय
Mon, 12/16/2013 - 17:39 नवीन
स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर लग्न व्हायच्या आधीची अवस्था कधीही गायीचे दूध न प्यालेल्या अश्वत्थाम्यासारखी असते. दूध काय हेच माहिती नसेल तर दूध नसल्याने फारसा फरक पडत नाही किंवा दूध म्हणुन काहिही मिळाले तरी चालते. एकदा दूधाची चव कळली की सगळीच गणिते बदलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते आहे हो, कमीतकमी कशाचीतरी

बॅटमॅन
Mon, 12/16/2013 - 17:42 नवीन
ते आहे हो, कमीतकमी कशाचीतरी चव मिळावी असे तर वाटणारच ना. ती कशी आहे वैग्रे पुढच्या गोष्टी झाल्या. बाकी सहमत हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बॅट्या

विनायक प्रभू
Mon, 12/16/2013 - 18:06 नवीन
तुला प्रश्न कळ्ळलाच नै. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा

पिलीयन रायडर
Mon, 12/16/2013 - 18:09 नवीन
तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा.. अनुभव नाही...पण तरी (रादर म्हणुनच) जोरजोरात चर्चा करत अस्तो तो मॅरिडलोकांच्या प्रॉब्लेम्स बद्दल..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

आणि तुला काय प्रत्येक

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 00:44 नवीन
आणि तुला काय प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झाल्याशिवाञ प्रॅक्टिस करू नये असेच म्हणायचे आहे बरोबर? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नाही..पण विंजेनेर ने

पिलीयन रायडर
Tue, 12/17/2013 - 13:10 नवीन
नाही..पण विंजेनेर ने गायनॉक्लोजिस्ट सोबत सी सेक्शन बद्दल हिरीरिने वाद घालु नयेत हे मात्र म्हणायचे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सी सेक्शनबद्दल वाद घालतोय हा

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 14:14 नवीन
सी सेक्शनबद्दल वाद घालतोय हा गूगलशोध पहिल्यांदाच पाहिला. मणोरञ्जणाबद्दल धण्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओक्के.

बॅटमॅन
Tue, 12/17/2013 - 00:43 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+१

टवाळ कार्टा
Mon, 12/16/2013 - 18:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

उत्तर

विनायक प्रभू
Mon, 12/16/2013 - 18:13 नवीन
@बॅ ट्या जनरल नॉलेज का स्वानुभव
  • Log in or register to post comments

...असो

सुहास..
Mon, 12/16/2013 - 18:58 नवीन
...असो !! आता उद्याच्या विषयाची तयारी करा ...काय नवीन / जुना विषय ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा