कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
यंदा दिवाळीमध्ये शनिवार-रविवार जोडुन चक्क ९ दिवस सुट्टी मिळाली होती. अर्थातच ती घरात बसुन घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे दिवाळीचा एक महिना आधी फराळापेक्षा ट्रिप प्लान करण्यातच जास्त वेळ गेला. अबीरला घेऊन पहिल्यांदाच जात असल्याने फार लांब जायचे नव्हते. शिवाय दिवाळीची बेसुमार गर्दी टाळायची होती. ह्या सगळ्या खेरीज एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे ४ सळसळणार्या रक्ताचे तरूण "कुठे जायचं" हे ठरवायला बसलेले असल्याने "एकमत" नावाचा इल्लुसा गड सर करायचा होता.
मिसळपाव