Skip to main content

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 26/01/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते.

मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 26/01/2014 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्‍यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल.

रानी की वाव

लेखक अजया यांनी रविवार, 26/01/2014 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसापासून गुजरातमधल्या राणी की वाव,अदलज,आणि मोढेरा इथले सूर्यमंदिर पाहायला जायचे चालले होते. पण नेहेमी बरोबर येणारे आमचे मित्र मंडळ नुसत्या मूर्ती आणि मंदिर बघायला जायच्या आमच्या बेताला फाटे फोडायला लागण्याआधी दिवाळीच्या दिवशी पहाटे अहमदाबादला जाणार्‍या विमानाचे आरक्षण पक्के करून टाकले! दुपारीच मेहेसाणामार्गे पाटणला येऊन पोहोचलो. पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. इथल्याच पाटण पाटोला साड्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या किमती विचारल्यावर तेवढ्या खर्चात आपण युरोपला जाउन येऊ अशी समजूत घालून पुढे निघालो.

अळूचं फदफदं

लेखक गणपा यांनी रविवार, 26/01/2014 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इथे भाजी मार्केटमध्ये अळूचं पान पाहिलं तेही कचरर्‍यात पडलेलं. इथले लोक अळूच्या पानांना काय म्हणतात ते माहित नसल्याने मग त्याच्याकडे बोट दाखवून विक्रेत्याला विचारलं की ही पानं कुठेशी मिळतील? त्यावर म्हणाला ही आम्ही विकत नाही कोथिंबीरीसारख्या भाज्या ने-आण करताना पॅकिंग म्हणुन वापरतो. मग त्याला विचारलं पुढल्यावेळी माझ्यासाठी थोडी वेगळी आणशील का? तर त्याने शुक्रवार पर्यंत थांबायला सांगीतल. त्याचा फोन नंबर घेऊन ठेवला आणि गुरुवारी त्याला पानं आणण्याची आठवण करुन दिली. परवा त्याने कबुल केल्या प्रमाणे पानं आणुन दिली.

धिस इज द सिस्टीम !

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 25/01/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
'विथ रेफरन्स टु धिस ऑफिस लेटर डेटेड सिक्स्थ डिसेंबर, वी आर टु इनफॉर्म यू दॅट ...' 'बीप बिपीप ...बीप बिपीप..' लँडलाइनच्या आवाजाने मी सेक्रेटरीला देत असलेले डिक्टेशन मधेच खंडित झाले. सकाळपासून मी ते महत्वाचे पत्र कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करीत होते. पण भेटायला येणाऱ्या लोकांच्या एकसारख्या फ्लोमुळे ते काही बेटे मूर्त स्वरूपात येईना. अखेर सेक्रेटरीला बोलावून मी ते पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न चालवला असताना पुन्हा या लँडलाइनने घात केला. 'ओह शिट...हॅलो ?' पहिले दोन शब्द अर्थातच मी रिसिव्हर उचलण्यापूर्वी म्हटले होते.

पाऊले चालती ठाकुर्लीची वाट

लेखक धन्या यांनी शनिवार, 25/01/2014 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊले चालती ठाकुर्लीची वाट फेसबुक वॉलचा पाहूनिया थाट हर्षुनिया भारी काहीही घडण्याने दिसता रिकामा कमेंटचा बॉक्स पाऊले चालती... मित्र दोस्त सारे मिपाकर हो ते करती लाईक पाहूनी स्टेटस पाऊले चालती... छापता तो कोट टायनी बुद्धाचा कमेंट दारिद्र्याचा व्हावा नायनाट पाऊले चालती... थोडा वेळ जाता पुन्हा लागे ओढ तसा घेई तो धाव चेपूच्या दारात पाऊले चालती...

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 25/01/2014 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः-http://misalpav.com/node/26703 ...पुढे चालू खिचडी प्रेमाचा उपास आंम्ही या कवितेतून सोडला आणी यजमान/गुरुजी नववादाचा अजुन एक नारळ फोडला....! ============================= उपासाच्या या सर्व पदार्थांना गुरुजि(लोकां) नी पहिले ३ ते ५ वर्ष कोऑपरेशन दिलं,की एक दिवस त्यांना स्वतःच्या पोटावर ऑपरेशन करवून घ्यावं लागतं. याच कारणास्तव आमच्या या गुरुजिंना एका नाडी वैद्याला गाठावे लागले. वैद्यराजांनी नाडी तपासली व एखादा ज्योतिषी भविष्य सांगतो,तशी त्यांनी बोलायला सुरवात केली. वैद्यराजः- कायम अस्वस्थता वाटते..वेळेवर भूक लागत नाही..

"परिस्थिती"

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 25/01/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
(सुनीत: वनहरिणी मात्रावृत्त) बर्फावरती झुंजूमुंजू थंड शांतता करे पहारा  शेकोटीची ऊब सोडता श्वास गोठतो, फुले शहारा  दूर कुठेसे शहर जागते आखडलेले पाय मोकळे पुन्हा एकदा सळसळती जे काल श्रमाने गाढ झोपले  बर्फावरच्या 'ह्याच्या' हाती बंदुक चमचमणारी काळी तंबूमधली झोप क्षणाची अंधुक सीमा घाली हाळी  शहराकाठी 'त्याची' जागा गाडी गाठायाची घाई  वेळ साधणे सूत्र दिनाचे वेगासंगे वाहत जाई  काही तत्त्वे थोड्या निष्ठा एकाचे जगण्याचे इंधन  कर्तव्याचे पाश टाकती दुसऱ्याच्या असण्याला बंधन  काय माहिती कुठली गोळी करील अवचित सावज 'याचे' तसेच 'त्याचे' जगणेसुद्धा ताणामधल्या सुप्त

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग १

लेखक Atul Thakur यांनी शनिवार, 25/01/2014 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः| न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत.

चारोळी स्वरूपात शब्दकोष

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंग्रेजीची 'daughter ' हिंदीत झाली 'बेटी' मराठी आईची 'लेक' शोभते खरी राजकुमारी. दिल्ली मुंबई सारखी सत्ता व व्यापाराचे केंद्र असलेल्या मोठ्या शहरांमधे भिन्न-भिन्न भाषा बोलणार्‍या लोकांचा सतत वावर असतो. अमीर खुसरोच्या काळात ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती. त्याचप्रमाणे व्यापाराचे मुख्य केंद्रही. दिल्लीचे स्थानिक निवासी हिंदी बोलणारे. दरबारात विदेशी राजदूत, सरदार आदि तुर्की- फारसी बोलणारे. मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार्‍यांचा वावरही दिल्लीत होता.